Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश

नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या ७,५०० वेतनवाढीचा मुद्दा महासभेत गाजला. जूनमध्ये मंजूर झालेल्या वेतनवाढीची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनाला धारेवर धरत १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 20, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीचा मुद्दा गाजला
  • विशेष भत्त्याची अंमलबजावणीही प्रलंबित असल्याने लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली
  • वाढीव वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली.
 

 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत सेवा आधारित कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन व विशेष भत्त्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा शुक्रवारी महासभेत चांगलाच गाजला. जून महिन्यात मंजूर झालेल्या ठरावाची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर तातडीचा विषय क्रमांक २९ सर्वानुमते मंजूर करून वाढीव वेतन व विशेष भत्त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली.

महासभेच्या बैठकीत सभागृह नेते सागर नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना मंजूर झालेली ७ हजार ५०० ची पगारवाढ प्रशासकीय लालफितीत अडकल्याने आक्रमक भूमिका मांडली. पालिका प्रशासन किमान वेतनापेक्षा जास्त पगार देण्यास सक्षम असताना आणि त्यासाठी पुरेशी निधीची उपलब्धता असतानाही कामगारांना यापासून वंचित ठेवले जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

ऑडीटच्या तांत्रिक कारणांचे ढोंग न करता, येत्या १५ दिवसांच्या आत गणपतीला नाही तर किमान दसऱ्याला तरी कामगारांचा सण गोड झाला पाहिजे! अशी ठाम भूमिका घेत त्यांनी या पगारवाढीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे अंतिम आदेश व इशारा महापालिका प्रशासनाला सभागृह नेते सागर नाईक यांनी दिला.

चीफ अकाउंट ऑफिसर आणि संबंधित प्रशासनाने तांत्रिक बाबींची पूर्तता करून नवरात्री-दसऱ्यापूर्वी कामगारांना वाढीव रकमेचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी प्रस्तावाचा अभ्यास तसेच काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी वेळ आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, १५ दिवसांच्या कालावधीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रशासनाने सभागृहात सांगितले.

यानंतर तातडीचा विषय क्रमांक २९ मंजुरीसाठी ठेवण्यात आला. सभागृहाने तो सर्वानुमते मंजूर केला. तसेच नगरसचिव विभागाला मंजूर ठराव तातडीने प्रशासनाकडे पाठवून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आला.

Navi Mumbai: तुर्भेतील घनकचरा प्रकल्पात विषारी वायूचा धोका? NMMCने आरोप फेटाळले, जाणून घ्या वस्तुस्थिती

तरतूद असतानाही प्रशासनाकडून विलंब

महासभेत सभागृह नेत्यांनी १९ जून रोजी मंजूर झालेल्या ठराव क्रमांक ७५२चा संदर्भदेत कंत्राटी कामगारांसाठी मंजूर करण्यात आलेला विशेष भत्ता आणि वेतनवाढ अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. कंत्राटातील ‘व्हेरिएशन क्लॉज’ नुसार सक्षम प्राधिकरणाच्या धोरणानुसार वेतनवाढ लागू करण्याची तरतूद असतानाही प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी करण्यात आला. वाढीव रकमेचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवून १५ दिवसांच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी या मागणीला पाठिंबा देत जूनपासून प्रलंबित असलेल्या विषयामुळे कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असल्याचे सांगितले.

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव

…अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

दरम्यान, महापौरांनी प्रशासनाच्या विलंबाबाचत नाराजी व्यक्त करत कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर सभागृहाची भूमिका स्पष्ट केली. कामगारांच्या वेतनवाढीची अंमलबजावणी वेळेत झाली नाही, तर गारांच्या पाठीशी उभे राहून संपूर्ण सभागृह कामगाराच्या रस्त्यावर उत्तरेल, असा इशारा त्यांनी दिला.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai contract workers salary hike 15 days action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Navi Mumbai

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.