Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Water Cut : नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मंगळवारी 10 तास पाणीपुरवठा बंद; अनेक नोडना फटका

Navi Mumbai Water Cut : नवी मुंबईत 3 नोव्हेंबर रोजी मोरबे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी 10 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोलीसह खारघर आणि कामोठे परिसरालाही फटका बसणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 01, 2026 | 05:06 PM
Navi Mumbai Water Cut : नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मंगळवारी १० तास पाणीपुरवठा बंद; अनेक नोडना फटका

Navi Mumbai Water Cut : नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मंगळवारी १० तास पाणीपुरवठा बंद; अनेक नोडना फटका

Follow Us
Follow Us:
  • मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बसविण्याचे काम
  • बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोलीत पाणीबाणी
  • सिडकोच्या खारघर-कामोठे परिसरालाही फटका
 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर (Navi Mumbai Water Cut) महत्त्वाची देखभाल व तांत्रिक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 10 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
या कालावधीत मोरबे मुख्य जलवाहिनीवरील विविध ठिकाणी बटरफ्लाय व्हॉल्व्ह, स्लुईस व्हॉल्व्ह आणि फ्लोमीटर बसविण्यात येणार असल्याने नवी मुंबईतील अनेक नोडमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंता विभागाने यासंदर्भात अधिकृत जाहीर आवाहन प्रसिद्ध केले आहे. शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करणे, जलवाहिनीवरील नियंत्रण सुधारणे आणि पाण्याचे वितरण अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने ही कामे करण्यात येणार आहेत.

सात ठिकाणी महत्त्वाची कामे

महानगरपालिकेच्या नियोजनानुसार सानपाडा, वाशी, बेलापूर आणि शिरवणे परिसरातील एकूण सात ठिकाणी विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. सानपाडा येथील मोराज सर्कलजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या 400 मिमी व्यासाच्या वितरण जलवाहिनीवर बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे. तसेच सानपाडा सेक्टर 30 येथील सामना प्रेसजवळील 250 मिमी व्यासाच्या वितरण जलवाहिनीवर स्लुईस व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येईल.

वाशी सेक्टर 19 मधील सातारा प्लाझाजवळ, एपीएमसी मार्केट परिसरात मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या 250 मिमी व्यासाच्या वितरण जलवाहिनीवर स्लुईस व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे. तर वाशी सेक्टर 22 येथे मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या 700 मिमी व्यासाच्या वितरण जलवाहिनीवर बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Navi Mumbai News: मांसाहारी भोजन आणि कथित मद्यपानाच्या तक्रारी; सीबीडीतील वारकरी भवनाची चौकशी करण्याची मागणी

बेलापूर सेक्टर 28 येथील पंपहाऊसमध्ये पंपाला जोडणाऱ्या 700 मिमी व्यासाच्या इनलेट जलवाहिनीवर बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येईल. तसेच बेलापूर सेक्टर 15 मधील किल्ला जंक्शन येथे मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या 900 मिमी व्यासाच्या वितरण जलवाहिनीवर बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे.

याशिवाय शिरवणे गावाजवळील 800 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण वाहिनीवर चार फ्लोमीटर बसविण्यात येणार आहेत. या फ्लोमीटरमुळे पाण्याच्या प्रवाहाचे मोजमाप करणे आणि पाणी वितरणावर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे.

या परिसरांतील पाणीपुरवठा राहणार बंद

या तांत्रिक कामांसाठी मंगळवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमधील संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठादेखील या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे या सर्व परिसरांतील नागरिकांना पाण्याच्या गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीटंचाईवर सिडकोचा ॲक्शन प्लॅन; ३४ टँकर GPSच्या निगराणीखाली

बुधवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा

मंगळवारी शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर बुधवारी, 4 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता महानगरपालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह आणि फ्लोमीटर बसविण्याची कामे महत्त्वाची मानली जात आहेत. या कामांमुळे भविष्यात पाणी वितरण व्यवस्थेचे अधिक प्रभावी नियंत्रण करणे शक्य होणार आहे. मात्र, या दहा तासांच्या शटडाऊनचा फटका हजारो नागरिकांना बसणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता शिशिर आरंदवाड यांनी केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबईत पाणीपुरवठा कधी बंद राहणार आहे?

    Ans: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

  • Que: पाणीपुरवठा किती तास बंद राहणार आहे?

    Ans: देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांसाठी एकूण 10 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

  • Que: नवी मुंबईतील कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे?

    Ans: बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांतील संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Web Title: Navi mumbai water cut 10 hours november 3 morbe pipeline rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • belapur news
  • Navi Mumbai
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: मांसाहारी भोजन आणि कथित मद्यपानाच्या तक्रारी; सीबीडीतील वारकरी भवनाची चौकशी करण्याची मागणी
1

Navi Mumbai News: मांसाहारी भोजन आणि कथित मद्यपानाच्या तक्रारी; सीबीडीतील वारकरी भवनाची चौकशी करण्याची मागणी

पुणेकरांना दिलासा ! शहरातील पाणीकपात तूर्त शिथिल; महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
2

पुणेकरांना दिलासा ! शहरातील पाणीकपात तूर्त शिथिल; महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीटंचाईवर सिडकोचा ॲक्शन प्लॅन; ३४ टँकर GPSच्या निगराणीखाली
3

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीटंचाईवर सिडकोचा ॲक्शन प्लॅन; ३४ टँकर GPSच्या निगराणीखाली

Water Shortage: अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांची वणवण; सरोज राय नागरिकांसह केडीएमसी कार्यालयात
4

Water Shortage: अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांची वणवण; सरोज राय नागरिकांसह केडीएमसी कार्यालयात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.