Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार

Navi Mumbai News: नवी मुंबईतील सायन्स पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले असून, विविध वैज्ञानिक मॉडेल्स आणि अंतर्गत कामांसाठी १०५ कोटी ५१ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. पार्कमध्ये १३५ वैज्ञानिक एक्झिबिट्स उभारले जाणार असून, विद्यार्थ्यांना विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 02, 2026 | 02:30 PM
नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग

नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामासाठी १०५ कोटी ५१ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी
  • सायन्स पार्कचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
  • पर्यावरण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, ऊर्जा, अंतराळ आणि रोबोटिक्सशी संबंधित मॉडेल्स असणार
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सायन्स पार्कचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, सायन्स पार्कमध्ये विविध वैज्ञानिक मॉडेल्स आणि अंतर्गत स्थापत्य कामे करण्यासाठी सुमारे १०५ कोटी ५१ लाख ४८ हजार १३१ रुपयांच्या प्रस्तावाला गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी झालेल्या स्थायी समितीत सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली.

या प्रकल्पामुळे पालिका क्षेत्रातील विद्याथ्यांना आणि नागरिकांना विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येणार असून शैक्षणिक दृष्ट्या हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सायन्स पार्क हे सुरू होण्याआधीच चर्चेत असून, या पार्कचे डोम जर्मनीहून आलेल्या साहित्याने बनवले गेले असल्याची माहिती मुख्य शहर अभियंत्यांनी दिली.

महासभेत या प्रस्तावावर चचर्चा करताना शिवसेनेच्या सरोज पाटील प्रकल्पाबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, सायन्स पार्कच्या कामासाठी आपण १०५ कोर्टींपेक्षा जास्त खर्च करत आहोत. मात्र या प्रस्तावामध्ये नेमके कोणते आणि किती सायन्स मॉडेल्स बसवले जाणार? याची माहिती मिळावी. पार्क बनवून झाल्यावर पुढील वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च या कंत्राटात समाविष्ट आहे का?

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

या सायन्स पार्कपासून पालिकेला किती उत्पन्न मिळेल? आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्याथ्यांना प्रवेश मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळणार का? सायन्स पार्कच्या इमारतीची स्थायी समिती सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणे आवश्यक आहे असे सरोज पाटील म्हणाल्या

कंत्राटदारांना ६ ते ८ महिन्यांत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्याच्या सूचना

लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्य शहर अभियता शिरीष आरदयड म्हणाले की, सायन्स पार्कचे दोन टप्प्यांत काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात १३५ एक्झिबिट्स (प्रदर्शन) बसवले जातील, जीवन विज्ञान, कॉम्प्युटराइज्ड
सिस्टीम, लाईट शो आणि प्रयोगात्मक, असतील, यात ६५ एविज्ञाबिट्स हे पर्यावरण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, ऊर्जा, अंतराळ, रोबोटिक्स आणि यंत्राशी संबंधित असणार आहेत.

निविदेनुसार कामासाठी १८ महिन्यांचा कालावधी असला तरी कंत्राटदारांना पुढील ६ ते ८ महिन्यांत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (काही स्ट्रक्चरल डिझाइन आणि डोमसाठी जर्मनीहून साहित्य मागवले होते. मात्र युद्धामुळे त्यास उशीर झाला.

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था

५ वर्षांची देखभाल व दुरुस्ती

या प्रस्तावामध्ये पुढील ५ वर्षांसाठी उपकरणांची, लाईट्स, लिफ्ट आणि अंतर्गत साहित्याची देखभाल-दुरुस्ती समाविष्ट आहे. दैनंदिन साफसफाई आणि व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रस्ताव महासभेत आणला जाणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड आणि अहमदाबाद येथील सायन्स पार्कची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्या धर्तीवर अधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात येत आहे. असला, तरी कंत्राटदारांना पुढील ६ ते ८ महिन्यांत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (काही स्ट्रक्चरल डिझाइन आणि डोमसाठी जर्मनीहून साहित्य मागवले होते. मात्र युद्धामुळे त्यास उशीर झाला,

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai news science park scientific exhibits project pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Municipal Corporation
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
2

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Navi Mumbai News : किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दल आक्रमक, अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून राडा, रबाळे पोलीस ठाण्याबाहेर तणाव
3

Navi Mumbai News : किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दल आक्रमक, अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून राडा, रबाळे पोलीस ठाण्याबाहेर तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.