Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Patil MNS : निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक बससेवा पुन्हा सुरू; राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Dombivli railway station bus : लोढा हेवन, निळजे परिसरातील नागरिकांच्या मागणीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक ही बंद झालेली बससेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2026 | 11:36 AM
निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक बससेवा पुन्हा सुरू; राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक बससेवा पुन्हा सुरू; राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Follow Us
Follow Us:
  • निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक बससेवा पुन्हा सुरू
  • राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
  • बंद बससेवा आजपासून पूर्ववत
Nilje Dombivli bus service : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी. आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्याकडे लोढा हेवन, निळजे परिसरातील नागरिकांनी निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक ही बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या या रास्त मागणीची तात्काळ दखल घेत राजू पाटील यांनी परिवहन विभागाकडे पाठपुरावा करून अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यानंतर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आजपासून ही बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. यावेळी या बसमार्गावर होणारे अतिक्रमण, फेरीवाल्यांचा वाढता त्रास तसेच अवैध पार्किंगमुळे वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. बससेवा सुरळीत व नियमितपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Satara News: सातारा शहरातील ३८५ इमारती धोकादायक; ६ अतिधोकादायक इमारती पाडण्याच्या नोटिसा

गेल्या काही काळापासून ही बससेवा बंद असल्यामुळे निळजे आणि लोढा हेवन परिसरातील नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः कामानिमित्त, शिक्षणासाठी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांवर किंवा रिक्षांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक भार वाढला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.

नागरिकांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत राजू पाटील यांनी परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात अधिकाऱ्यांना पत्र देऊन बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांशी चर्चा करून बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

याच माध्यमातून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात येते की, फेरीवाले व अवैध पार्किंग यांमुळे ही बससेवा पुन्हा बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील.आज सुरू झालेल्या बससेवेच्या पहिल्या फेरीप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, विभाग अध्यक्ष रोहित भोईर, विभाग सचिव दीपक पवार, समाजसेवक निवृत्ती पाटील, विभाग सचिव पुष्पाताई भोर, वाहतूक सेनेचे अनुज दिवेकर, उपविभाग अध्यक्ष अशोक गायकर तसेच शाखाध्यक्ष राजेश काशीकर तसेच इतर पदाधिकारी, नागरिक व‌ प्रवासी उपस्थित होते. या प्रसंगी चालक,वाहक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला व नारळ वाढवून या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच तत्पर असून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! जलपुरवठा यंत्रणा हायटेक करण्यासाठी पालिकेची उपाययोजना, नागरिकांना मिळणार शुद्ध हवा-पाणी

Web Title: Nilje dombivli railway station bus service restarted raju patil follow up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Dombivli
  • MNS
  • raju patil

संबंधित बातम्या

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’
1

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
2

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
3

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
4

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.