Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्व नालेसफाईला सुरूवात ; पालिका आयुक्तांनी दिले आदेश

ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामास सोमवारपासून सुरूवात झाली आहे.  कामे पावसाळ्यापूर्वी, मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील, याबाबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी माहिती दिली आहे .

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2025 | 07:53 PM
ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्व नालेसफाईला सुरूवात ; पालिका आयुक्तांनी दिले आदेश
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे : ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामास सोमवारपासून सुरूवात झाली आहे.  कामे पावसाळ्यापूर्वी, मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील, याबाबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी माहिती दिली आहे . पहिल्या टप्प्यात पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील काम २५ एप्रिलपासून काम सुरू होणार आहे. नालेसफाईचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे. झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदविण्यात यावी. तसेच, संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्याचा दैनंदिन अहवाल ठेवावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. नाल्यातून उचललेला गाळ तत्काळ उचलला जावा. त्यामुळे दुर्गंधी पसरू नये, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

सोमवारी सकाळी कापूरबावडी पोलीस स्टेशनलगत असलेल्या नाल्याच्या सफाईने या मोहिमेचा आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. त्यावेळी, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त स्मिता सुर्वे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते. त्यानंतर, हरदास नगर येथील नालेसफाईच्या कामास आरंभ करण्यात आला.

पाठोपाठ, रेल्वे मार्गालगत, ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता फाटक आणि नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आणि सोपान भाईक, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आणि ऋषिकेश जवळकर आदी उपस्थित होते.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे २७८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पहिल्या टप्प्यात नौपाडा-कोपरी, उथळसर, माजिवडा-मानपाडा, दिवा आणि कळवा या पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात, मुंब्रा, लोकमान्य नगर-सावरकर नगर, वर्तक नगर आणि वागळे इस्टेट नालेसफाईचे काम सुरू होणार आहे.

Web Title: Pre monsoon drain cleaning begins in thane municipal corporation area municipal commissioner gives orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत
1

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार
2

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार

Thane Crime: ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या
3

Thane Crime: ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.