Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरे यांना मोठा दिलासा ! कल्याण रेल्वे स्टेशन मारहाण प्रकरणात ठाणे न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

मोठी बातमी समोर येत असून अठरा वर्षांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकावरील रेल्वे परीक्षार्थीना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

  • By विवेक
Updated On: May 21, 2026 | 02:33 PM
Raj Thackeray acquitted in 2008 Kalyan Railway station assault case, 2008 Kalyan Railway station assault case,, Raj Thackeray News, Raj Thackeray, Thane Court,

Raj Thackeray acquitted in 2008 Kalyan Railway station assault case, 2008 Kalyan Railway station assault case,, Raj Thackeray News, Raj Thackeray, Thane Court,

Follow Us
Follow Us:

मोठी बातमी समोर येत असून अठरा वर्षांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकावरील रेल्वे परीक्षार्थीना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राज ठाकरे यांच्यासह सहा जणांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुरुवारी (२१ मे) ठाणे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. व्ही. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला असून राज ठाकरेंसह सहा जणांना या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे.

२००८ साली रेल्वे भरतीनिमित्त परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. कल्याण रेल्वे स्थानकात घडलेल्या या याप्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते. २००८ साली नव्यानेच स्थापन झालेल्या राज ठाकरे यांच्या मनसेकडून मराठीच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलने करण्यात येत होती. अश्यातच २००८ साली निघालेल्या रेल्वे भरती प्रक्रियेत उत्तर भारतीय तरुणांना रेल्वेकडून जास्त प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत होता. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय तरुणांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती.

या मारहाणीच्या घटनेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह आठ मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन कार्यकर्त्यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याने राज ठाकरे यांच्यासह सहा कार्यकर्त्यांवर कल्याण दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु होती त्यानंतर हे प्रकरण ठाणे जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले.

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?

या प्रकरणात राज ठाकरे यांची बाजू वकील शैलेश वाडेकर, शुभम कानडे आणि सयाजी शिंदे यांनी लढवली तर सरकारी पक्षाकडून वकील प्रमिला चव्हाण या युक्तिवाद करत होत्या. ६ मे रोजी झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांनी हे प्रकरण बनावट असल्याचे सांगून आपल्यावरील आरोप फेटाळले होते. गुरुवारी पुन्हा झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायाधीश ए. व्ही. कुलकर्णी यांनी पुराव्याअभावी आणि बचावपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत राज ठाकरे यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे.

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा

Web Title: Raj thackeray aquitted in 2008 kalyan railway station assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • MNS
  • MNS Chief Raj Thackeray
  • Raj Thackeary

संबंधित बातम्या

Mumbai Protest: राज-उद्धव ठाकरे एकत्र; निवडणूक आयोगाविरोधात आझाद मैदानात आंदोलन
1

Mumbai Protest: राज-उद्धव ठाकरे एकत्र; निवडणूक आयोगाविरोधात आझाद मैदानात आंदोलन

‘स्वतःचं अपयश लपवण्यासाठी..,’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी रामदास कदमांचं मोठं वक्तव्य; ठाकरे बंधूंवर निशाणा
2

‘स्वतःचं अपयश लपवण्यासाठी..,’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी रामदास कदमांचं मोठं वक्तव्य; ठाकरे बंधूंवर निशाणा

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
3

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.