Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात धर्म, सण-उत्सव आणि डीजे-डॉल्बीच्या वाढत्या वापरावर भाष्य केले. रामायणाबाबत कथाकारांकडून केल्या जाणाऱ्या कथित अतिशयोक्त दाव्यांची खिल्ली उडवत त्यांनी रावणाची एक लाख मुले आणि दीड लाख नातवंडे असल्याच्या दाव्यावर मिश्कील सवाल केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 07, 2026 | 04:46 PM
‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो काही खात-पित होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो काही खात-पित होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Follow Us
Follow Us:
  • ‘अस्त्रालयाचं ऑस्ट्रेलिया झालं, मग हॉलंड-इंग्लंडचं काय?’
  • राज ठाकरेंनी उडवली कथित दाव्यांची खिल्ली
  • राज ठाकरेंचा DJ-डॉल्बीला विरोध, धार्मिक कट्टरतेवरही प्रहार
Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सण-उत्सवांचे बदलते स्वरूप, डीजे-डॉल्बीचा वापर आणि धर्माच्या नावावर केल्या जाणाऱ्या दाव्यांवर जोरदार भाष्य केले. देश सध्या धर्माच्या अतिरेकाकडे जात असल्याची भूमिका मांडत त्यांनी श्रद्धा आणि धार्मिक कट्टरता यामध्ये फरक करण्याची गरज असल्याचे सांगितले.

राज ठाकरे म्हणाले की, देवावर श्रद्धा असणे आणि आपल्या धर्माचा अभिमान असणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचे रूपांतर धार्मिक कट्टरतेत होता कामा नये. देशात निर्माण झालेल्या वातावरणामागे इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

रावणाच्या मुलांच्या दाव्यावर मिश्कील टोला

भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी एका कथाकाराचे नाव न घेता रामायणाबाबत सांगितल्या जाणाऱ्या काही कथित दाव्यांवर उपरोधिक टीका केली. संबंधित कथाकार रावणाची एक लाख मुले आणि दीड लाख नातवंडे युद्धात मारली गेल्याचे सांगतात, असा उल्लेख त्यांनी केला. यावर राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे सवाल केला की, रावणाला दहा डोकी असल्याचे आपल्याला माहिती आहे; पण त्याला एक लाख मुलं होती? मग त्याला काही खायला-प्यायलाही वेळ मिळत होता की नाही? त्यांच्या या टिप्पणीवर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

कथावाचकाच्या प्रवचनातील रावणाच्या ‘एक लाख पुत्रां’च्या दाव्यावर राजसाहेबांचा मिश्किल आणि सूचक टोला.#RajThackeray #MNSAdhikrut pic.twitter.com/XQYLXlM2Q9 — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 6, 2026

‘अस्त्रालय’वरून ‘ऑस्ट्रेलिया’चा किस्सा

यानंतर राज ठाकरे यांनी आणखी एका कथित दाव्याचा उल्लेख केला. राम-रावण युद्धात वापरण्यात आलेली शक्तिशाली अस्त्रे चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागू नयेत म्हणून प्रभू श्रीरामांनी हनुमानाला ती सुमारे 10 हजार किलोमीटर दूर नेऊन ठेवण्यास सांगितले आणि त्या जागेला ‘अस्त्रालय’ म्हटले गेले. पुढे त्याच ‘अस्त्रालय’चे नाव ‘ऑस्ट्रेलिया’ झाले, असा दावा संबंधित कथाकार करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यावर त्यांनी उपरोधिकपणे, ‘अस्त्रालयाचं ऑस्ट्रेलिया झालं असेल, तर मग हॉलंड, इंग्लंड आणि न्यूझीलंडचं काय?’ असा सवाल केला. या टिप्पणीवरही सभागृहात हशा पिकला.

डीजे-डॉल्बी संस्कृतीवर टीका

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सण-उत्सवांमध्ये वाढलेल्या डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टीमच्या वापरावरही नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील उत्सवांमध्ये उत्तर भारतातील डीजे-डॉल्बी संस्कृती आणली जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गोविंदा-दहीहंडी उत्सवात काही ठिकाणी महिलांना स्टेजवर नाचण्यासाठी बोलावले जाते, अशा प्रकारांवरही त्यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्राने आपली संस्कृती जपून सण कसे साजरे करायचे याबाबत काही नियम आणि मर्यादा असायला हव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

लेझर आणि मोठ्या आवाजाच्या परिणामांकडे लक्ष

सण-उत्सवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझर लाइटमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, तर डॉल्बी सिस्टीमचा अतिप्रचंड आवाज हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतो, असेही राज ठाकरे म्हणाले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव ज्या उद्देशाने सुरू केले, त्या मूळ हेतूचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माच्या नावाखाली भान हरवू नका; सण साजरे करा, मात्र धार्मिक कट्टरता समाजासाठी घातक ठरू शकते, असा संदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Web Title: Raj thackeray mocks ravana one lakh sons australia astralaya claim slams dj dolby culture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
1

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल
2

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा
3

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
4

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.