Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा; बारवी धरण ५९ टक्क्यांवर, धरणसाठ्यात समाधानकारक वाढ

ठाणे जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणांतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ५९.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 23, 2026 | 09:30 AM
पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना...

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना...

Follow Us
Follow Us:
  • ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा
  • बारवी धरण ५९ टक्के भरले
  • नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी संकट दूर होणार
ठाणे जिल्ह्यात सध्या पावसाची उघडझाप सुरू असली तरी, जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत असल्याने नागरिकांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. बारवी धरणाचा पाणीसाठा आता निम्म्याहून अधिक म्हणजेच ५९.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. या धरणात सध्या २००.७६ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून, धरण पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांतील पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात पावसाचे प्रमाण असमान असल्याचे दिसून येते. ज्यामुळे पावसाची उघडझाप सुरू असल्याचे स्पष्ट होते.

ठाण्यामध्ये सर्वाधिक ७० मिमी, तर भिवंडीत सर्वात कमी २६ मिमी पाऊस

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४८.७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात अंबरनाथ तालुक्यात ५२ मिमी आणि उल्हासनगरमध्ये ४१ मिमी पाऊस बरसला आहे. दुसरीकडे, ठाणे तालुक्यात सर्वाधिक ७० मिमी आणि मीरा-भाईंदरमध्ये ६७ मिमी पावसाची नोंद झाली असताना, भिवंडीत सर्वात कमी म्हणजेच केवळ २६ मिमी आणि कल्याणमध्ये ३० मिमी पाऊस पडला आहे. चालू पावसाळ्यातील आतापर्यंतच्या एकूण पावसाचा विचार केल्यास जिल्ह्याची आजवरची पावसाची सरासरी ४७.०६ टक्के इतकी झाली आहे.

Dombivli News: ‘बॅज लावूनच फिरा, म्हणजे पक्ष कळेल’; मनसे मेळाव्यात राजू पाटील यांची दीपेश म्हात्रेंवर सडकून टीका

नद्यांची पाणीपातळी वाढली; पाणी संकट होणार दूर

धरणांतील या आशादायक चित्रामुळे भविष्यातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. यासोबतच, नद्यांची स्थितीही सध्या पूर्णपणे सुरक्षित आहे. बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीची पातळी १४.५० मीटर, अंबरनाथमधील जांभूळपाडा येथे १२.४० मीटर आणि मोहने येथे ७.०० मीटर इतकी नोंदवली गेली असून या सर्व नोंदी धोका आणि इशारा पातळीपेक्षा बऱ्याच खाली आहेत

जिल्ह्यातील इतर धरणांमध्येही जमा झाला मुबलक पाणीसाठा

पावसाचे प्रमाण सर्वत्र एकसमान नसले तरी, बारवी पाठोपाठ जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणामध्येही मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. शहापूर तालुक्यातील तानसा धरण ९७.९६ टक्के भरले असून त्यात १४२.१२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला आहे, तर मोडक सागर धरणही ९०.१२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय, मोठ्या क्षमतेच्या भातसा धरणात ६७.४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.

Metro 14 Update: बदलापूर–कांजूरमार्ग मेट्रोला गती; ठाणे खाडीखालून धावणार भुयारी मार्ग

पाणीटंचाईची चिंता कमी

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सर्वत्र समान नसले तरी धरणांमध्ये सातत्याने वाढणारा पाणीसाठा ही सकारात्मक बाब मानली जात आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी भविष्यातील पाणीटंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, प्रशासनही आगामी पाणीपुरवठ्याबाबत अधिक आश्वस्त झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारवी धरणातील पाणीसाठा सध्या किती आहे?

    Ans: बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सध्या सुमारे ५९.२५ टक्के झाला आहे.

  • Que: बारवी धरणाचा पाणीपुरवठा कोणत्या शहरांना होतो?

    Ans: बारवी धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली तसेच ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांना पाणीपुरवठा केला जातो.

  • Que: धरणांतील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांना काय फायदा होणार?

    Ans: पाणीटंचाईची शक्यता कमी होऊन आगामी काळात नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होईल.

Web Title: Satisfactory increase in abundant water storage in barvi dams of thane district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Dam Water Level
  • maharashta
  • thane

संबंधित बातम्या

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी
1

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
2

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ
3

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ

Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत ‘प्रभारी अधिकारी’ पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू
4

Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत ‘प्रभारी अधिकारी’ पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.