Dombivli News: 'बॅज लावूनच फिरा, म्हणजे पक्ष कळेल'; मनसे मेळाव्यात राजू पाटील यांची दीपेश म्हात्रेंवर सडकून टीका
राजू पाटील म्हणाले, “मी बोलण्याच्या ओघात ‘तो रवी कुठे’ असे म्हटले. मात्र, त्याचा वेगळाच अर्थ काढून बाजार मांडण्यात आला. माझा आक्षेप बॅज लावून जाण्याबाबत होता. दीपेश म्हात्रे यांनी तो बॅज लावूनच जावे, म्हणजे ते कोणत्या पक्षात आहेत हे सर्वांना समजेल. दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुकू नको. अरे तू थुकून थुकून थोबडा ओला केला आहे.”
काही दिवसांपूर्वी मनसे नेते राजू पाटील यांनी डोंबिवलीतील दुरावस्ते बाबत बोलताना असे विधान केले होते की, रवी दिसला आहे. परंतु डोंबिवलीतील रवी दिसत नाही. राजू पाटील यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी राजू पाटलांवर पलटवार केला होता. रवी म्हणजे सूर्य. सूर्यावर थुकायचे नसतं. दीपेश म्हात्रे यांच्या या वक्तव्याला मनसे नेते राजू पाटील यांनी पलटवार केला आहे.
यावेळी त्यांनी दावा केला की, “ठाकरे पक्षासोबत वाटाघाटी सुरू असतानाच दीपेश म्हात्रे पक्ष सोडणार हे आम्हाला माहीत होते. त्यामुळे आम्ही आधीच ‘प्लॅन बी’ तयार ठेवला होता. तसेच, आम्ही कोणत्याही पक्षात गेलो नाही. अटी-शर्तींसह सत्ताधाऱ्यांसोबत गेलो आहोत. मतदारसंघातील विकासकामे करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असेही राजू पाटील यांनी स्पष्ट केले. मनसेच्या मेळाव्यात राजू पाटील यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपा नगरसेवक दीपेश महाराष्ट्र यांना लक्ष केले आहे आता भाजपाकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजू पाटील पुढे म्हणाले की, रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. मग त्यांनी डोंबिवली साठी काय केलं? भुंकणारे कुत्रे मला ट्रोल करत आहेत की आम्ही काय केलं. हॉस्पिटल कोविडमध्ये दिलं, तर आरोप करतात दहा लाख भाडं घेतलं. याची माहिती देखील त्यांना नाही, त्यावेळेला कोणी कोणाच्या घरी, नातेवाईकांकडे जात नव्हते. कोविडच्या वेळेला हॉस्पिटल देण्याची दानत मी दाखवली. हे जे आरोप करतात त्यांच्या थोबाडावर हे मारा आणि यांचा दादा कोकणात आईनस्टाईनसारखा दाढी वाढून बसलेला. हा त्याच्यात आणि माझ्यातला फरक आहे. गवंडी सारखं हॅन्ड ग्लोज घालून तो फिरायचा आणि हे आम्हाला सांगतात. लाखो रुपये कोविडमध्ये मी खर्च केले केलेले. मदत बोलून दाखवायची नसते मात्र यांच्या अंध भक्तांना हे मला सांगायचं आहे. मला तीन वेळा कोविड झाला. आता हे त्यांच्या जिल्ह्याला माझ्यावर टीका करण्यासाठी बोलतात, त्यामुळे त्यच्यावर त्याच पद्धतीने उत्तर द्या.
रवींद्र चव्हाण यांना इशारा देत राजू पाटील म्हणाले की, डोंबिवलीचं राजकारण असं नव्हतं. यांना वाटतं आम्ही सगळ्यांवर भारी आहे. एका लिमिट पर्यंत सहन करा, नंतर उत्तर द्या. माहौल खराब होईल असं काय करू नका. सगळे मला बोलतात दादा यांना काहीतरी करू पण मी बोललो ते मुद्द्यावर बोलतात का? रवींद्र चव्हाण यांनी हॉस्पिटलसाठी काय केलं?
सगळ्यांना विनंती आहे की, यांच्या मागे लागू नका. मी सक्षम आहे. माझ्या बाजूलाच आहे. तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही.. आम्ही तुमच्या बरोबर नाही मात्र शिवसेना तुमच्या बरोबर आहे. चार चांगल्या गोष्टी घेऊन या एकत्र काम करा. चांगले विषय घेऊन पुढे जा. या कुत्र्या मांजराच्या पाठी लागू नका, असे आवाहन राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.






