
फोटो सौजन्य- chatgpt
श्रावणमास म्हणजे भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि आत्मचिंतनाचा काळ. याच पवित्र श्रावणमासाचे औचित्य साधत डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तकांची विशेष पर्वणी वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘घरोघरी आध्यात्मिक पुस्तके’ या संकल्पनेतून धार्मिक साहित्य घराघरांत पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, वाचनसंस्कृतीला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे डोंबिवलीकरांकडून स्वागत होत आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तक वाचनाची सवय कमी होत असताना धार्मिक आणि आध्यात्मिक साहित्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. श्रावणातील धार्मिक वातावरणाला वाचनाची जोड देत संत साहित्य, संत चरित्रे, भगवद्वीता, रामायण, महाभारत, पुराणे, अध्यात्मविषयक ग्रंथ तसेच भारतीय संस्कृती आणि संस्कारांची ओळख करून देणारी पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते, मात्र या धार्मिक वातावरणासोबतच ग्रंथवाचनातून मनन, चिंतन आणि आत्मपरीक्षणाची सवय लागावी, हा या उपक्रमामागील व्यापक विचार आहे. धार्मिक ग्रंथ केवळ पूजाघरात ठेवण्याऐवजी ते वाचले जावेत आणि त्यातील विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणले जावेत, यासाठीही या उपक्रमातून प्रोत्साहन दिले जात आहे. मुख्य म्हणजे लहान मुले आणि तरुण पिढ़ी भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि अध्यात्माशी जोडली जावी यासाठी पालकांनी मुलांना धार्मिक व सरकारक्षम पुस्तके वाचण्यास प्रवृत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुस्तक हे केवळ ज्ञानाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडविणारे प्रभावी माध्यम आहे या विचारातून पै लायब्ररीकडून सातत्याने वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन दिले जात आहे.
पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै हे डोंबिवलीतील वावन चळवळीशी दीर्घकाळ जोडलेले असून, पुस्तकांच्या माध्यमातून समाजात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आले आहेत. पुस्तकांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना जोडण्याबरोबरच वाचनाची सवय पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
श्रावणमास निमित्ताने धार्मिक ग्रंथ वाचनाची ही संधी उपलब्ध करून देत भक्ती, संस्कार आणि वाचन यांचा सुंदर संगम बडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरातील दर्शन आणि धार्मिक विधींसोबतच काही वेळ ग्रंथांच्या सहवासात घालवण्याची प्रेरणा देगारी ही आगळीवेगळी पुस्तक पर्वणी डोंबिवलीव्या सांस्कृतिक विश्वात लक्षवेधी ठरत आहे. श्रवणात एक धार्मिक पुस्तक घरी आणा, वाचा आणि त्यातील संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोदया असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात येत असून डोंबिवलीकरांनी या वावनपर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पै लायब्ररीचे सर्वेसर्वा पुंडलिक पै यांनी केले आहे.
Ans: श्रावणमासात धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने भक्ती, आत्मचिंतन आणि आध्यात्मिक विचारांना चालना मिळते, अशी श्रद्धा आहे.
Ans: धार्मिक आणि आध्यात्मिक साहित्य घराघरांत पोहोचवून वाचनाची सवय वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
Ans: धार्मिक आणि संस्कारक्षम पुस्तकांमधून मुलांना भारतीय संस्कृती, परंपरा, संतविचार आणि नैतिक मूल्यांची ओळख होण्यास मदत होऊ शकते.