Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

ठाणे शहरातील रेमंड रहिवासी संकुलात सलग दुसऱ्या वर्षी भव्य दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार आहे. यंदा ११ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २१ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून, उत्सवासाठी सुरक्षा आणि वैद्यकीय यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 03, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रेमंड संकुलात सलग दुसऱ्या वर्षी भव्य दहीहंडी उत्सव
  • महिला गोविंदा पथकासाठी विशेष बक्षीस
  • ११ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला २१ लाखांचे बक्षीस
ठाणे शहरातील प्रतिष्ठीत रेमंड रहिवाशी संकुलात सलग दुसऱ्या वर्षी भव्य दहीहंडीचा थरार रंगणार आहे. युवा स्टार प्रतिष्ठान’चे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांनी उत्सवाचे आयोजन केले असून, ११ थरांसाठी २१ लाख रुपयांचे, तर १० थरांसाठी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सात थर रचणाऱ्या महिला गोविंदा पथकाला १ लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांनी ही माहिती दिली. ‘युवा स्टार प्रतिष्ठान ‘बरोबरच टेन एक्स हॅबिटंट, आशियाना निवासी संकुल आणि खेड तालुका रहिवाशी संघातर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रेमंड रहिवासी संकुलात मराठी नागरिकांबरोबरच परराज्यांतील नागरिकांची संख्या मोठी आहे. या भागातील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक आदी विविध उपक्रम युवा स्टार प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीची नागरिकांना ओळख करून देण्याबरोबरच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची वर्तकनगर येथील विक्रमी दहीहंडी आणि युवा नेते पूर्वेश सरनाईक यांनी प्रो-गोविंदा संकल्पना राबवून गोविंदांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून दिल्याचा आदर्श ठेवून रेमंड संकुलात सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सव भरविण्यात येत आहे, अशी माहिती आयोजक तुकाराम आंब्रे यांनी दिली.

उत्सवाची जय्यत तयारी, वैद्यकीय यंत्रणाही सज्ज

उत्सवात लाखो रुपयांची बक्षिसे आहेत. गेल्या वर्षी उत्सवात १०० हून अधिक पथकांनी सहभाग घेतला होता. पहिल्या वर्षांच्या यशानंतर यंदा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या उत्सवात जन्माष्टमीच्या सोहळ्यावेळी रेमंड संकुलातील बच्चे कंपनीकडून हंडी फोडली जाईल. तसेच लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार असून, स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जाणार आहे.

Thane Dahi Handi 2026: टेंभीनाक्यावर दहीहंडीचा थरार; मुंबई-ठाण्याच्या गोविंदांना मिळणार १.५१ लाखांचे बक्षीस

भव्य दहीहंडी उत्सवात पहिल्यांदा ११ थर रचणाऱ्या पथकाला २१ लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल.
तर सर्वप्रथम १० थर रचणाऱ्या पथकाला ५ लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल.

सर्वप्रथम नऊ थर रचणाऱ्या पथकाला २ लाख रुपये दिले जातील. त्यानंतर ९ थर लावणाऱ्या गोविंदांना १ लाख रुपये बक्षीस दिले जाईल.

८ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला २५ हजार रुपये, सात थरांसाठी १० हजार रुपये, सहा थरांसाठी ५ हजार, ५ थरांसाठी ३ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह दिले जाईल.

यंदा रेमंड दहीहंडीत एकही गोविंदा जखमी होऊ नये, यासाठी सुरक्षा टीम सज्ज राहील. त्याचबरोबर दुर्घटनेच्यावेळी तत्काळ उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे.

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन

अनेक मान्यवर राहणार उपस्थित

या उत्सवाच्या यशस्विततेसाठी अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांच्याबरोबरच मंडळाचे खजिनदार परशुराम आंब्रे, राहुल सादरे, राजेंद्र कुंभार, मुकुंद डोके, संकेत कदम, विशाल खसे, श्रीकांत भागवत, शैलेश अहिरराव, निबेन चंद्रन, चिंतन पटेल, वैभव गोवेकर, प्रशांत केकाणे, राजेश सावंत, अमेय जाधव, विराज दोशी, प्रशांत यादव, संजय लोणे, संदिप खांबे, सुनील जंगम, अंकुश माने, दिलीपराज पवार, धीरज देशमुख, स्वप्नील माळी, जितेंद्र तारमाळे, रुक्मिणी त्रिवेदी, संजय सुर्वे, अतुल गुप्ता, निखिल केरकर, सागर कड, महेश कश्यत, अमरीश कल्लूर, भास्कर ऐनकर, विजय नागावकर, किशोर मोरे, भरत खरिवले, गगन टाक, राजेश प्रजापती, विश्वास खेतले, अभिजित साजेकर, आशिष कदम आदी कार्य करीत आहेत. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून गोंविदा पथकांना प्रोत्साहन देणार आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane dahi handi 2026 dahi handi excitement in raymond for the second consecutive year prizes worth lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Dahi Handi
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन
1

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन

Thane Dahi Handi 2026: टेंभीनाक्यावर दहीहंडीचा थरार; मुंबई-ठाण्याच्या गोविंदांना मिळणार १.५१ लाखांचे बक्षीस
2

Thane Dahi Handi 2026: टेंभीनाक्यावर दहीहंडीचा थरार; मुंबई-ठाण्याच्या गोविंदांना मिळणार १.५१ लाखांचे बक्षीस

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ
3

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ

दृष्टिहीन गोविंदांच्या जिद्दीला सलाम! दहीहंडी पथकांना लाखोंचे प्रोत्साहन; हिंदू प्राण प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आयोजन
4

दृष्टिहीन गोविंदांच्या जिद्दीला सलाम! दहीहंडी पथकांना लाखोंचे प्रोत्साहन; हिंदू प्राण प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.