Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: ईद-ए- मिलादच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. भिवंडी, कल्याण, मुंब्रा, राबोडी आणि विठ्ठलवाडी परिसरात काही मार्गांवर निर्बंध लागू राहणार असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 26, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ईद-ए- मिलादच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात वाहतुकीत मोठे बदल
  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे
  • मिरवणुकीच्या मार्गावर काही ठिकाणी ‘नो पार्किंग’चे निर्बंध लागू असतील
 

मुस्लिम बांधवांच्याईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने बुधवारी २६ ऑगस्ट रोजी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांदरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी आणि मुंब्रा परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणे वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बुधवारी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.

अंबाडी नाका व पारोळ फाटाः वाड्याकडून भिवंडीकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने राष्ट्रीय महामार्ग ८ किंवा जलवाहिनी मार्गाने वळवण्यात आली आहेत. तसेच नदीनाका मार्गे शहरात येणाऱ्या वाहनांना पारोळ फाट्यावर बंदी असून, हलकी वाहने खोणीगाव, तळवळी फाटा, कांबा रोड मार्गे जातील. चाविंद्रा व जांबोळी नाकाः वडपे तपासणी नाक्याकडून शहरात येणाऱ्या वाहनांना जांबोळी व चाविंद्रा नाका येथे बंदी असेल. बस प्रवाशांना चाविंद्रा नाक्यावर उतरवले जाईल. इतर वाहने धामणकरनाका जलवाहिनी मार्गे पुढे जातील.

आग्रा रोडमार्गे वाहनांना बंदी

ठाणे-कल्याणकडून जुना आग्रा रोड मार्गे जाणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पंपापुढे बंदी असून, ही वाहने नागाव मार्गे धावतील. रांजनोली नाका रांजनोली चौकातून भिवंडीत येणाऱ्या एसटी, केडीएमटी, रिक्षा व जड वाहनांना बंदी असेल. ही वाहने मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका, अंजुरफाटा अथवा वसई रोड मार्गे जातील.

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

कल्याण व विठ्ठलवाडी विभागातही मार्गात बदल

कल्याण: पत्रीपूल, एपीएमसी मार्केट आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने पत्रीपूल येथून डावे वळण घेऊन गोविंदवाडी बायपास मार्गे पुढे रवाना होतील.

विठ्ठलवाडीतील नेहरूनगर, उल्हासनगर जुने बस स्टॉप, हिललाईन पोलिस ठाणे, नेताजी चौक, भाटिया चौक, कुर्ला कॅम्प रोड ते कैलास कॉलनी या मिरवणूक मार्गावर मिरवणूक पुढे जाईपर्यंत ‘नो पार्किंग’ लागू राहील. वाहनांना मुख्य रस्ता सोडून पर्यायी रस्त्यांवर पार्किंगची मुभा असेल.

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र

मुंब्रा व राबोडी विभागात जड वाहनांना बंदी

मुंब्रा येथील रेतीबंदर मार्गे शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना, तसेच खासगी व सरकारी बसेसना रेतीबंदर आणि ‘वाय’ जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने रेतीबंदर मुंब्रा बायपास मार्गाने पुढे जातील किंवा प्रवाशांना रेतीबंदर येथेच उतरवून परतावे लागेल.

तसेच राबोडीतील के. व्हिला नाका मार्गे आकाशगंगा व राबोडीकडे जाणाऱ्या वाहनांना के. व्हिला येथे बंदी असेल. ही वाहने माँ मीनाताई ठाकरे चौक रोडने जुन्या राबोडी पोलिस ठाण्यामार्गे इच्छित स्थळी जातील.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane eid e milad 2026 traffic diversions alternative routes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • thane
  • Thane news
  • Traffic

संबंधित बातम्या

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश
1

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी
2

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी

Badlapur News: ज्ञानेश कुमार यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आंदोलन
3

Badlapur News: ज्ञानेश कुमार यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आंदोलन

Navi Mumbai Traffic: कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
4

Navi Mumbai Traffic: कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.