
Thane News: एकीकडे हृदयाची झडप, दुसरीकडे रक्तस्रावाचा धोका; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
त्यामुळे त्यांच्या पोटातून सारखा रक्तस्त्राव व्हायचा. याआधी त्यांना अनेक वेळा रक्त द्यावं लागलं होतं. आता अशा परिस्थितीत हृदयाच्या झडपेवर उपचार करायचा म्हणजे मोठं आव्हान होतं. एकीकडे झडप बदलणं गरजेचं होतं आणि दुसरीकडे रक्तस्त्राव परत होणार नाही याची काळजी पण घ्यायची होती.
ठाण्याच्या किम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या आजींची पूर्ण तपासणी केली. सगळ्या विभागाच्या डॉक्टरांनी एकत्र बसून विचार केला. मग त्यांनी एक निर्णय घेतला. ओपन हार्ट सर्जरी न करता TAVI नावाची आधुनिक पद्धत वापरायची.TAVI म्हणजे काय तर छाती न उघडता, फक्त मांडीच्या शिरेतून एक नळी हृदयापर्यंत नेली जाते आणि खराब झालेल्या झडपेच्या जागी नवीन कृत्रिम झडप बसवली जाते. ही पद्धत कमी त्रासाची असते.
किम्स हॉस्पिटलचे हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. बी. सी. कलमठ यांनी केली.झडप अरुंद झाली की काय होतं?जेव्हा हृदयाची झडप अरुंद होते तेव्हा रक्त पुढे जात नाही. माणसाला धाप लागते, छातीत दुखतं, खूप थकवा येतो, चक्कर येते आणि काही काम करायची ताकदच राहत नाही. म्हाताऱ्या माणसांमध्ये हा आजार जास्त धोकादायक असतो. त्यामुळे योग्य उपचार निवडणं खूप गरजेचं असतं.या आजींच्या बाबतीत तर रक्तस्त्रावाचा इतिहास असल्याने डॉक्टरांना जास्तच काळजी घ्यावी लागली.
Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा …
झडप बदलताना रक्ताची गुठळी होऊ नये आणि रक्तस्त्राव पण होऊ नये याचा बॅलन्स साधावा लागला.यावर डॉ. कलमठ म्हणाले, अशा रुग्णावर उपचार करताना फक्त झडप बदलून चालत नाही. पुढे काय गुंतागुंत होऊ शकते याचा आधीच विचार करावा लागतो. TAVI मुळे आम्हाला हे शक्य झालं. आम्ही प्रत्येक पावलावर रक्तस्त्राव होतोय का हे बघत होतो. सुदैवाने ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं. रक्तस्त्राव किंवा सूज अशी काहीच समस्या आली नाही. आणि आश्चर्य म्हणजे 48 तासात आजींना आम्ही घरी सोडलं.
साध्या ओपन हार्ट सर्जरीमध्ये छाती कापावी लागते आणि हार्ट-लंग मशीन लावावं लागतं. पण TAVI मध्ये असं काहीच नसतं. फक्त पायाच्या शिरेतून झडप टाकली जाते. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो आणि हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस राहावं लागत नाही.पण प्रत्येकाला TAVI करता येईलच असं नाही. रुग्णाचं वय किती आहे, त्याची तब्येत कशी आहे, हृदयाची रचना कशी आहे हे सगळं बघून डॉक्टर ठरवतात की ऑपरेशन करायचं की TAVI करायची.या आजींना ऑपरेशननंतर ICU मध्ये ठेवलं होतं. सगळं स्थिर होतं. ना रक्तस्त्राव झाला ना दुसरं काही. दोन दिवसात त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला.
या केसने दाखवून दिलं की वय झालं म्हणून घाबरून चालत नाही. योग्य प्लॅनिंग असेल तर मोठ्यात मोठी शस्त्रक्रिया पण सोपी होते. रक्तस्त्रावाचा इतिहास आहे म्हणून झडप बदलता येणार नाही असं नाही. फक्त डॉक्टरांनी नीट तपासून योग्य निर्णय घ्यायला हवा.जर तुम्हाला विनाकारण धाप लागत असेल, सतत थकवा येत असेल, चक्कर येत असेल, छातीत दुखत असेल तर त्याला म्हातारपण आहे म्हणून सोडून देऊ नका. वेळीच डॉक्टरांना दाखवा.
Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह
लवकर तपासणी केली तर आजार लगेच कळतो आणि उपचार सोपे होतात.या 71 वर्षीय आजींच्या बाबतीत पण तेच झालं. हुशारीने केलेल्या प्लॅनिंगमुळे आणि आधुनिक TAVI पद्धतीमुळे त्यांचा जीव वाचला आणि दोन दिवसात त्या घरी गेल्या