Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीकर वसुलीबाबत ठाणे मनपा अ‍ॅक्शनमोडवर; माजिवडा-मानपाडा परिसात राबविली कर वसूल मोहिम

विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिल वसुलीबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 20, 2025 | 04:49 PM
पाणी कर वसुलीबाबत ठाणे मनपा अ‍ॅक्शनमोडवर; माजिवडा-मानपाडा परिसात राबविली कर वसूल मोहिम

पाणी कर वसुलीबाबत ठाणे मनपा अ‍ॅक्शनमोडवर; माजिवडा-मानपाडा परिसात राबविली कर वसूल मोहिम

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे:  महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिल वसुलीबाबत आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. गुरूवारी मोठे गृहसंकुल, टाॅवर येथे कारवाई करण्यात आली. ब्रम्हांड फेज तीन, लोढा क्राऊन, दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात या भागातून 50 लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली.

पाणी बील भरलेले नसल्याने दोस्ती कोरोना सोसायटीचा पाणी पुरवठा सकाळी बंद करण्यात आला. त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी आठ लाख 67 हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणी पुरवठा लगेच सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे, बाळकूम येथे लोढा क्राऊन आणि परिसरातील इमारतींवरही कारवाई करण्यात आली. संबंधित वेगवेगळ्या ग्राहकांनी एकूण सुमारे 13 लाख 51 हजार रुपयांचा बिलाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

कल्याण डोंबिवलीकरांच्या वाट्याला काय? मनपाच्या अर्थसंकल्पात 3 हजार 361 कोटींची तरतूद 

 

काय म्हणाले पालिका आयुक्त ? 

नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसेच, मार्चअखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, पाणी पुरवठा विभागाने उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वात वर्तक नगर, लोकमान्य नगर आणि सावरकर नगर, माजिवडा-मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी वसुली मोहीम राबवली.

आर्थिक वर्षात 127 कोटींची वसुली

पाणी पुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या 225 कोटी रुपयांपैकी 127 कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गेल्यावर्षीच्या याच काळातील वसुलीपेक्षा 12 कोटी रुपयांनी अधिक आहे.

चवदार तळं सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण ; राजकीय नेत्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एम…तर पाणी पुरवठा बंद करणार

मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केले. 31मार्चनंतर अभय योजना नाही तसेच, थकबाकीवरील प्रशासकीय आकार / दंड/ व्याज यांच्यावर लागू असलेली 100 टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत 31मार्च, 2025 पर्यंतच असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Web Title: Thane municipal corporation on action mode regarding water tax collection tax collection campaign implemented in majivda manpada area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • latest news
  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध
1

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद
2

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर
3

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास
4

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.