चवदार तळं सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण ; राजकीय़ नेत्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आजच्या दिवशी 98 वर्ष पूर्ण झाली आहेत. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीची सुरुवात महाडच्या ऐतिहासिक भूमीतून केली. त्या दिवसापासून 20 मार्च या दिनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा केला जातो. या ऐतिहासिक दिवसाची आठवण ठेवत चवदार तळे सत्याग्रह दिनी संपूर्ण देशभरातून लाखोंच्या संख्येने भीमसैनिक महाड येथे दाखल होत असतात.
आज 20 मार्च 2025 रोजी 98 व्या चवदार तळ्या वर्धापनदिनी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ व रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे अभिवादन केले.यावेळी हेलिकॉप्टर मधून चवदार तळ्या वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देण्यात आली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री गोगावले यांनी चवदार तळ्याच्या 100 व्या वर्धापन दिनाची तयारी याच वर्षी केली जाणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठी एकत्रित बैठक करणार असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी 14 तळ्याचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी फिल्टरेशन प्लांट व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून शंभराव्या वर्धापन दिनाच्या अधिक केली जाईल असे आश्वासित केले आहे.
चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्ताने महाडमध्ये भिमसैनिकांनी लाठ्या काठ्या या पारंपरिक शस्त्रांच्या खेळ सादर केले होते. महाड शहरातून चवदार तळ्यापर्यंत भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. दरम्यान या सगळ्याबरोबर या भिमसैनिक आणि आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने चवदार तळ्यावर उपस्थितची दर्शवत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं आहे.