Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांचा एल्गार; राज्य सरकारविरोधात ठेकेदारांचं छत्री आंदोलन

इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तत्काळ बिल अदा केली जात आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली "छत्री आंदोलन" करण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 04, 2025 | 06:36 PM
Thane News : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांचा एल्गार; राज्य सरकारविरोधात ठेकेदारांचं छत्री आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/स्नेहा काकडे,जाधव : गेले अनेक वर्षे ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकासकामे केली आहेत. मात्र, त्यांना त्यांची बिले अदा केली जात नाहीत. उलटपक्षी इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तत्काळ बिल अदा केली जात आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली “छत्री आंदोलन” करण्यात आले.

एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा अन् फडणवीसांनी दिला पवारांचा दाखला; म्हणाले, “त्यांच कर्नाटकवर जास्त प्रेम…”

राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे मार्गी लावणाऱ्या तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांची ९० हजार कोटींची बिल थकवली आहेत. थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी, आम्ही अनेकदा आंदोलने केली, ५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. मात्र आतापर्यंत ४ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे.तसेच इन्फ्रावाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात पण कंत्राटदारांना पैसेही देत नाहीत.थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन दिले जाते. त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे आहेत. पावसाळा संपला की या छत्र्या अडगळीत बंद केल्या जात असतात. हे माहित असूनही वर्षानुवर्ष राज्यात विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामे देऊन बिले अदा केली जात असल्यानेच हे छत्री आंदोलन केल्याचे सांगितले.

Eknath Shinde Jay Gujarat : “जय गुजरात…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात घोषणा, वाद पेटणार

दरम्यान,जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्य सरकारने सुमारे दीड लाख कोटींची कामे नियमबाह्य पद्धतीने वाटली. त्यावेळी अर्थ विभागाचीही परवानगी घेतली गेली नव्हती. त्यामुळेच सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील विविध विभागांत झालेल्या विकास कामांच्या देयकांची ४० हजार कोटी रुपयांची थकीत रक्कम तातडीने मिळावी, राज्य सरकारने कोणत्याही विभागाचे विकास काम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे, विकास कामे करताना संबंधित कंत्राटदारास संरक्षण देण्याचा कायदा करावा, शासनाने सर्व विभागांच्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठी निविदा काढणे तातडीने बंद करावे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास या खात्यांमधील कामांचे वाटप अभियंत्यांना नियमांनुसार करावे आदी मागण्या यावेळी मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना केल्या. या आंदोलनात अनिल नलावडे,बाळकृष्ण ठाकरे,चेतन शिंदे,मिलिंद साठे,हर्षद गंधे प्रवीण बाहेती,मनुरकर सपकाळ ,सरोदे हांडे ,बाविस्कर दर्शना शिंदे ,रवी मालुसरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Thane news contractors protest in front of the district collectors office contractors chhatri andolan against the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 06:35 PM

Topics:  

  • Marathi News
  • muncipal corporation
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Ashish Shelar :  निवडणुका जिंकल्यानंतर Uddhav Thackeray यांना माझं अनेकदा अभिनंदन करावे लागेल
1

Ashish Shelar : निवडणुका जिंकल्यानंतर Uddhav Thackeray यांना माझं अनेकदा अभिनंदन करावे लागेल

आंबेगाव-जुन्नरच्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार; नरभक्षक बिबट्याचा प्रश्न कायम
2

आंबेगाव-जुन्नरच्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार; नरभक्षक बिबट्याचा प्रश्न कायम

Kolhapur News : प्रशस्त बंगला फोडून साडेसोळा तोळे दागिन्यांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटामुळे गावकरी भयभीत
3

Kolhapur News : प्रशस्त बंगला फोडून साडेसोळा तोळे दागिन्यांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटामुळे गावकरी भयभीत

Astrology : ‘या’ राशीचे पती-पत्नी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा; यांच्या गाठी स्वर्गातच जुळतात
4

Astrology : ‘या’ राशीचे पती-पत्नी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा; यांच्या गाठी स्वर्गातच जुळतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.