Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा

राज्य शासन दलित - मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देत नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य मनपा कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 05, 2025 | 05:54 PM
Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव काकडे : सन 2004 मध्ये राज्य शासनाने सेवांतर्गत पदोन्नतीत आरक्षण देण्याचा कायदा रद्द केला होता. हे आरक्षण पूर्ववत करण्याचा निर्णय न्यायालयात झाला आहे. तरीही, राज्य शासन दलित – मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देत नाही. हे आरक्षण तत्काळ लागू करावे, या मागणीसाठी सोमवारपासून (दि. 8 ) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अर्धनग्न उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र चांगो शिंदे यांनी दिला आहे.

या संदर्भात रवींद्र शिंदे यांनी प्रधान सचिव, ठामपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, भारतीय संविधानात मूलभूत हक्काच्या कलम 16 (4 अ) नुसार पदोन्नती मधील असलेली संविधानिक आरक्षणाची तरतूद महाराष्ट्र सरकारने सन 2004 मध्ये रद्द केली होती. निवड नसलेल्या पद्धतीने पदोन्नतीमध्ये आरक्षण सर्व सेवा गटांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना अनुक्रमे 15% आणि 7.5% दराने उपलब्ध आहे.

Thane News : पुढच्या वर्षी लवकर या…! आज 49 हजार गौरी गणपतींचे विसर्जन

निवड पद्धतीने पदोन्नतीच्या बाबतीत, गट ‘अ’ च्या सर्वात कमी श्रेणीपर्यंत समान दराने आरक्षण उपलब्ध आहे. मात्र, पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करून हा कोटा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्गांसाठीचा महाराष्ट्रातील पदोन्नतीमधील 33 टक्के आरक्षणाचा मुद्दा गेली चार वर्षे रखडलेला होता.

2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून पदोन्नतीतील सर्व टप्प्यांवर आरक्षण देण्याचा महाराष्ट्राचा 25 मे 2004 चा ‘शासन निर्णय’ (जीआर) रद्द झाला आहे. मात्र, सरकारने अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे सन 2004 पासून अनुसूचित जाती – जमातीमधील अनेक शासकीय अधिकाऱ्यांना सेवांतर्गत पदोन्नतीपासून वंचित रहावे लागले आहे. ही बाब सामाजिक न्याय या तत्त्वाचा अवमान करणारी आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही भंग आहे. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण तत्काळ सुरू करावे; अन्यथा, येत्या सोमवारपासून (दि. 8 सप्टेंबर) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपरोक्त संघटनेच्या वतीने अर्धनग्न बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

Dombivli Potholes: डोंबिवलीतील नागरिकांच्या पाठपुराव्याला यश; मोठागाव-रेतीबंदर रोडची दुरुस्ती सुरू

 

Web Title: Thane news half naked indefinite hunger strike from monday maharashtra municipal employees union warns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • Marathi News
  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪
1

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

Bhayander crime : बेजबाबदारपणाचा कळस ! दारूच्या नशेत शाळेची बस चालवत होता अन्…. ड्रायव्हरला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
2

Bhayander crime : बेजबाबदारपणाचा कळस ! दारूच्या नशेत शाळेची बस चालवत होता अन्…. ड्रायव्हरला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Explainer: हलाल घरे किंवा हलाल वसाहती म्हणजे काय, भारतात का उफाळलाय वाद?
3

Explainer: हलाल घरे किंवा हलाल वसाहती म्हणजे काय, भारतात का उफाळलाय वाद?

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी
4

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.