Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: ३०० रुपयांचा दगड ७५० रुपयांना? वाई नगरपरिषदेच्या पाथवे कामाची चौकशी करा; विजय ढेकाणेंचा सवाल

Wai Pathway Work Municipal Council News: वाई नगरपरिषदेच्या ब्राह्मणशाही घाट परिसरातील सुमारे तीन कोटी रुपयांच्या पाथवे कामात दगडाच्या बाजारभावापेक्षा अंदाजपत्रकातील दर अधिक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 11, 2026 | 08:31 PM
Wai Pathway Work

Wai Pathway Work

Follow Us
Follow Us:
  • पाथवेच्या कामात दगडाचे दर अवाजवी?
  • विजय ढेकाणेंचा आरोप
  • स्वतंत्र तांत्रिक तपासणीचा आग्रह
वाई: वाई नगरपरिषदेच्या ब्राह्मणशाही घाट व परिसरात करण्यात आलेल्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या पाथवे कामातील दगडाचे दर आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अंदाजपत्रकातील दर, प्रत्यक्ष वापरलेले साहित्य आणि खर्चाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, जनतेच्या पैशांचा अपव्यय खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

CJP Protest Mumbai : मुंबईत CJP आंदोलनावरून राडा! आदित्य-तेजस ठाकरे आंदोलनात उतरले, ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा

पाथवेच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या दगडाचा बाजारभाव सुमारे २५० ते ३०० रुपये असताना संबंधित कन्सल्टंटने अंदाजपत्रकात ७५० रुपये दर दाखविल्याचा आरोप ढेकाणे यांनी केला आहे. बाजारभाव आणि अंदाजपत्रकातील दरामध्ये एवढी तफावत कशी निर्माण झाली? दर निश्चित करताना कोणता आधार घेण्यात आला? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

या कामातील दगड कोल्हापूर येथून आणण्यात आला असून, त्याची किंमत आणखी कमी असल्याचेही ढेकाणे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वापरलेल्या दगडाचा प्रकार, गुणवत्ता, जाडी आणि बाजारमूल्य यांची पडताळणी करून अंदाजपत्रकातील दराशी तुलना करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कामाच्या गुणवत्तेबाबतही ढेकाणे यांनी आक्षेप घेतला आहे. कामासाठी आरएमसी अर्थात रेडी मिक्स काँक्रीट वापरण्याच्या सूचना असताना प्रत्यक्षात साधे मिश्रण वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मंजूर तांत्रिक निकषांनुसार काम झाले आहे का, याची स्वतंत्र तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.नगरपरिषदेच्या प्रशासकीय काळात हे काम झाले असल्याने प्रशासकीय मान्यता, कन्सल्टंटची नियुक्ती, अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया, मंजूर दर, वापरलेले साहित्य आणि अदा करण्यात आलेली बिले यांची चौकशी करावी. केवळ कागदपत्रांपुरती तपासणी मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कामाचा दर्जाही तपासावा, असा आग्रह ढेकाणे यांनी धरला आहे.

“वाईकर जनतेच्या पैशातून हे काम झाले आहे. त्यामुळे प्रत्येक रुपयाचा हिशेब जनतेला मिळाला पाहिजे. अंदाजपत्रकातील दर आणि बाजारभावातील तफावतीची चौकशी झाली पाहिजे. कामाचा दर्जाही तपासला गेला पाहिजे. जनतेने आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असून, त्यांचा विश्वास जपणे ही आमची जबाबदारी आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असेल, तर ती खपवून घेणार नाही. गरज पडल्यास जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला.या कामाच्या प्रशासकीय मान्यतेपासून अंतिम बिलापर्यंतची कागदपत्रे सार्वजनिक करावीत आणि दर व गुणवत्तेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा स्वतंत्र चौकशीतून उलगडा करावा, अशी मागणीही ढेकाणे यांनी केली आहे.

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप

Web Title: Wai municipal council pathway work inquiry vijay dhekane allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
1

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

वाईत ९६ लाखांचा डेकोरेटिव्ह पोल प्रकल्प रखडला; दीड वर्षांत ३२ पैकी फक्त ५ पोल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
2

वाईत ९६ लाखांचा डेकोरेटिव्ह पोल प्रकल्प रखडला; दीड वर्षांत ३२ पैकी फक्त ५ पोल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
3

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.