Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : कारशेडबाधित शेतकऱ्यांचा तीव्र संताप; मोघरपाड्याचा प्रश्न अधिवेशनात घेणार

मेट्रो प्रकल्पाबाबत कारशेडसाठी मोघरपाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. कारशेडसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत त्याबाबत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 27, 2025 | 03:00 PM
Thane News :  कारशेडबाधित शेतकऱ्यांचा तीव्र संताप; मोघरपाड्याचा प्रश्न अधिवेशनात घेणार
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे: मेट्रो प्रकल्पाबाबत कारशेडसाठी मोघरपाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. कारशेडसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत त्याबाबत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. मोघरपाडा येथील नियोजित कारशेडसाठी शेतकऱ्यांची संपादित केलेली जमीन आणि त्याबदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याबाबत शासनाने केलेल्या घोषणांमुळे बाधित शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. वर्ग १ ची जमीन आणि अन्य मागण्या शेतकऱ्यांच्या पदरात पडाव्यात यासाठी शासनस्तरावर आणि अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

Chhagan Bhujbal News: हिंदी भाषा सक्तीकरणासह, जनसुरक्षा विधेयकावर छगन भुजबळांचे सूचक विधान; म्हणाले…

मोघरपाडा कारशेडसाठी मानंमानी कारभार सुरु आहे अशी याचिका न्यायालयात सादर करण्यात आली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे कारशेडबाधित शेतकऱ्यांचा तीव्र संताप होत आहेत. याचपार्श्वभूमीवर मोघरपाडा येथील कारशेडबाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी आमदार संजय केळकर यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा शेतकऱ्यांनी पुनरुच्चार केला. १६७ शेतकऱ्यांना मोबदला म्हणून ८० वर्षांच्या कराराने जमिनी न देता वर्ग १ च्या जमिनी देण्यात याव्यात, १४.४ टक्केसह दोन एफएसआय देण्यात यावा तसेच देण्यात येणाऱ्या जमिनीचा अधिकृत नकाशा आणि सातबारा देण्यात यावा, असे निर्णय सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आले होते. या मागण्यांची पूर्तता व्हावी, असे साकडे शेतकऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे घातले.

Chhagan Bhujbal News: हिंदी भाषा सक्तीकरणासह, जनसुरक्षा विधेयकावर छगन भुजबळांचे सूचक विधान; म्हणाले…

याबाबत केळकर यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनातही या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे केळकर म्हणाले. बाधित शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नसून त्यांना न्याय-हक्क हवा आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून बाधित शेतकऱ्यांसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार का हे  पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Thane news strong anger among farmers affected by car shed mogharpada issue will be taken up in the session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • metro news
  • Thane news

संबंधित बातम्या

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
1

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार
2

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत
3

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान
4

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.