
फोटो सौजन्य- pinterest
नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबरपासून होत आहे आणि मंगळवार २० ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी हा उत्सव संपणार आहे. या काळात ठाण्यातील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.
ठाण्यातील प्रसिद्ध आणि मानाच्या टेंभी नाका नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने मोठे फेरबदल केले आहेत. रविवार, ४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत टेंभी नाका परिसरातील मुख्य मार्गावर २४ तास वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.
दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. टेंभी नाका येथे नवरात्रोत्सवानिमित्त होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता हे बदल करण्यात आले आहेत.
ठाणे स्टेशन, टॉवर नाका आणि दगडी शाळा चौकातून वीर सावरकर मार्गाने टेंभी नाका व सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या टीएमटी, एसटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना सुजय हॉटेल कट येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही वाहने सुजय हटिल कट येथून उजवीकडे वळून मनपा शाळा क्रमांक १७ मार्गे कोर्टनाका सर्कलवरून पुढे इच्छितस्थळी जातील.
चरईहून एदलजी रोडने भवानी चौक व टेंभी नावयाकडे जाणाऱ्या वाहनांना धोबी आळी क्रॉस, फेअर अपार्टमेंट येथे प्रवेश बंद राहील.
ही वाहने धोबी आळी क्रॉसपर्यंत सरळ जाऊन डावीकडे वळतील आणि धोबी आळी चौक, मशीद व सिव्हिल हॉस्पिटलमार्गे पुढे रवाना होतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड तसेच मीनाताई ठाकरे चौकाकडून सिव्हिल हॉस्पिटल कॉर्नरमार्गे टेंभी नाक्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सिव्हिल हॉस्पिटलजवळ प्रवेशबंदी असेल, ही वाहने सिव्हिल हॉस्पिटल कॉर्नरवरून जीपीओ, कोर्टनाका सर्कल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे पुढे इच्छितस्थळी जाऊ शकतील.
टेंभी नाका नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडणे फायदेशीर ठरणार आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)