Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbra Drug Seizure: मुंब्र्यात ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उघडकीस? ४ परदेशी नागरिकांकडून १.५ किलो मेफेड्रोन जप्त

Mumbra Drug Seizure: ज्या मुंब्र्यात ड्रग्स तस्करीची कुसकुस सुरू होती, तिथेच ठाणे पोलिसांनी मोठी सर्जिकल स्ट्राइक केली आहे! सम्राट नगरमधील एका घरात छापेमारी करत पोलिसांनी ४ परदेशी नागरिकांच्या मुसक्या आवळल्या आणि तब्बल दीड कोटींचे मेफेड्रोन जप्त केले. काय आहे या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे जाळे?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 30, 2026 | 05:31 PM
Mumbra Drug Seizure: आकाशात नाही, थेट मुंब्र्यातील फ्लॅटमध्ये काळाबाजार! परदेशी नागरिक जाळ्यात; दीड कोटींचे ड्रग्स जप्त!

Mumbra Drug Seizure: आकाशात नाही, थेट मुंब्र्यातील फ्लॅटमध्ये काळाबाजार! परदेशी नागरिक जाळ्यात; दीड कोटींचे ड्रग्स जप्त!

Follow Us
Follow Us:
  • मुंब्र्यात ४ परदेशी नागरिकांकडून १.५ किलो मेफेड्रोन जप्त
  • टांझानियन व नायजेरियन नागरिकांना अटक; चौकशी सुरू
  • ड्रग्ज सेवन करणाऱ्या ६२५ जणांवर कारवाई करण्यात आली
Mumbra Drug Seizure: ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थांविरोधात (ड्रग्ज) पोलिसांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा आणि परिमंडळात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत. मुंब्रा परिसरात पोलिसांनी धाड टाकून तब्बल दीड कोटी रुपयांचे मेफेड्रोन (MD) ड्रग जप्त केले असून, यात चार परदेशी नागरिकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ड्रग्स तस्करांचे नेटवर्क हादरले आहे.

सम्राट नगरमधील कारवाईत दीड कोटींचे एमडी जप्त

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सम्राट नगरमधील हरीओम बिल्डिंगमध्ये काही परदेशी नागरिक अंमली पदार्थांचा साठा बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले, ज्यामध्ये ३ जण टांझानिया देशाचे तर १ जण नायजेरियन नागरिक आहे. अंगझडती आणि घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल दीड किलो एमडी (मेफेड्रोन) ड्रग सापडले. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये असून, मोबाईल फोन व कागदपत्रांसह एकूण मुद्देमाल १ कोटी ५० लाख २५ हजार रुपयांचा आहे.

हेही वाचा: Alephata Crime News: आळेफाटा परिसरात खळबळ! २६ वर्षांच्या तरुणाकडे सापडला गावठी कट्टा अन् जिवंत काडतुसे!

व्हिसा, कागदपत्रे अन् ‘फॉरवर्ड-बॅकवर्ड लिंकेज’चा तपास

पकडलेले परदेशी नागरिक भारतात कधीपासून आले? कोणत्या व्हिसावर आले? त्यांच्या व्हिसा आणि पासपोर्टची मुदत संपली आहे का? यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का? या सर्व बाजूंचा कसून तपास सुरू आहे. तसेच, त्यांना राहण्यासाठी कोणी परवानगी (Live-in Licence) दिली आणि घराचा खरा मालक कोण आहे, याचाही शोध घेतला जात आहे. हे ड्रग्स ते कुठून आणायचे आणि पुढे कोणाला पुरवणार होते, या संपूर्ण ‘बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज’चा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस तांत्रिक आणि मानवी गुप्त माहितीचा (Technical & Human Intelligence) वापर करत आहेत.

सेवन करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा; जनजागृती मोहीम तीव्र

केवळ तस्करांवरच नव्हे, तर ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांवरही ठाणे पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.

  • मुंब्रा हद्दीत १ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत ६२५ लोकांवर ड्रग्स सेवनाबाबत कारवाई करण्यात आली आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या ९५० जणांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई झाली आहे.

अमलबजावणीसोबतच शाळा, महाविद्याले आणि सामान्य नागरिकांमध्ये अंमली पदार्थांचे धोके समजावून सांगण्यासाठी जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे.

हेही वाचा: Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!

इराणी वस्तीत गांजा बाळगणाऱ्यावर कारवाई

याशिवाय, मुंब्रा परिसरातील इराणी वस्तीमध्ये गांजाची विक्री व साठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सव्वा किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा ओडिशा आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमधून बाहेरून मागवला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्याचे स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. (ही संपूर्ण कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालयाने स्वतंत्रपणे पार पाडली असून यात नवी मुंबई पोलिसांचा सहभाग नव्हता.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे आणि कोणत्या पोलिसांनी केली?

    Ans: ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत मुंब्रा पोलिसांनी केली असून यात नवी मुंबई पोलिसांचा संबंध नाही.

  • Que: मुंब्र्यातील कारवाईत किती रुपयांचे ड्रग्स जप्त झाले?

    Ans: मुंब्र्यातील सम्राट नगरमध्ये टाकलेल्या छाप्यात सुमारे १ कोटी ५० लाख २५ हजार रुपये किमतीचे १.५ किलो एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त झाले.

  • Que: या प्रकरणात किती परदेशी नागरिकांना अटक झाली?

    Ans: यामध्ये ३ टांझानियन आणि १ नायजेरियन अशा एकूण ४ परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Thane police seize md drugs worth crores in mumbra arrest four foreigners sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Drug Case
  • Drugs Case
  • Thane News update

संबंधित बातम्या

Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे… तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी
1

Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे… तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी

नालासोपारा एमडी ड्रग्ज प्रकरणाचे तेलंगणापर्यंत धागेदोरे, अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक
2

नालासोपारा एमडी ड्रग्ज प्रकरणाचे तेलंगणापर्यंत धागेदोरे, अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.