ठाणे : शहरात ठीक-ठिकाणी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. मलंग शेख असं सराईत गुन्हेगाराचं नाव असून पोलिसांनी ५ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ६ महागाड्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
शहरात ठिक ठिकाणी वाहनचोरी चोरी होतं असल्याने चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ,आरोपी मलंग शेख दुचाकीचोर अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून अटक केलीये. आरोपीची कसून चौकशी केली असता ६ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिलीये.दरम्यान, पोलिसांनी ५ लाख ४०हजर रुपये किंमतीच्या महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
[read_also content=”पाकिस्तानात सिंधमध्ये हिंदू तरुणीची हत्या, अपहरणास तसेच धर्मांतर करण्यास विरोध केल्यामुळे डोक्यात मारली गोळी, जबरदस्तीने लग्न करण्याची आरोपीची होती इच्छा https://www.navarashtra.com/world/in-sindh-pakistan-a-hindu-girl-was-murdered-shot-in-the-head-for-opposing-the-abduction-and-conversion-the-accused-wanted-to-get-married-forcibly-nrab-258159
/”][read_also content=”पत्नीशी भांडण झाल्यानंतर पेटवलं स्वत:चं घर; शेजाऱ्यांची पोलिसांत धाव https://www.navarashtra.com/maharashtra/paschim-maharashtra/solapur/after-a-quarrel-with-his-wife-husband-set-fire-to-his-own-house-in-solpaur-nrps-258263/”]