Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TMC Election 2026: टिटवाळ्यात EVM वर उमेदवाराचे भलतेच नाव! मतदारांमध्ये गोंधळ, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

ठाण्यातील टिटवाळा येथे प्रभाग क्रमांक 3 मधील EVM मशीनवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शेखर वाकोडे यांचे चुकीचे नाव छापल्याने मतदारांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 15, 2026 | 02:51 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • टिटवाळा येथे प्रभाग क्रमांक 3 मधील EVM मशीनवर उमेदवाराचे चुकीचे नाव
  • EVM मशीनवर शेखर वाकोडे यांचे ‘शेख’ असे चुकीचे नाव छापले
  • या गोंधळामुळे निवडणूक रद्द करण्याची मागणी
संपूर्ण महाराष्ट्रात मनपा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आज महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान असल्याने राज्यातील अनेक उमेदरावांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. राज्यात २९ महानगरपालिका आहेत, ज्यांच्यासाठी आज मतदानप्रक्रिया सुरु आहे. मात्र, टिटवाळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. टिटवाळा येथे प्रभाग क्रमांक 3 मधील EVM मशीनवर उमेदवाराचे नाव चुकीचे छापल्याने एकच खळबळ उडाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

नेमकं घडलं काय?

टिटवाळ्यातील प्रभाग क्रमांक ३ येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शेखर अप्पाराव वाकोडे यांचे नाव EVM मशीनवर चक्क शेख अप्पाराव वाकोडे असे दिसत असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच, उमदेवार शेखर वाकोडे वयानी देखील संताप व्यक्त केला आहे. यासोबतच, निवडणूक प्रक्रियेवर देखील प्रश्न विचारले जात आहे.

Mira Bhayandar Election 2026: मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल

स्वतः उमेदवारांनी शोधून काढली चूक

टिटवाळ्यातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये आज सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होताच एक गंभीर प्रकार समोर आला. शरद पवार गटाचे उमेदवार शेखर वाकोडे हे स्वतः मतदानासाठी मतदान केंद्रावर गेले असता, ईव्हीएम मशीनवर तसेच बाहेर लावण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावात चूक आढळून आली. शेखर वाकोडे यांच्या नावाऐवजी फक्त ‘शेख’ असे नाव नमूद करण्यात आले होते. या चुकीमुळे त्यांची ओळख, जात आणि धर्म बदलल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शेखर वाकोडेंचा संताप

या प्रकरणावर शेखर वाकोडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या 5 वर्षांपासून आपण या परिसरात सातत्याने जनसंपर्क ठेवून मेहनत घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ईव्हीएम मशीनवर तसेच मतदान केंद्राबाहेरील अधिकृत डिस्प्लेवर आपले नाव चुकीच्या पद्धतीने दाखवून प्रशासनाने मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक मतदारांकडून आपल्याला फोन येत असून, यादीत तुमचे नाव का नाही, अशी विचारणा केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नाव दुरुस्त करण्याची विनंती केली होती, मात्र ती नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार आपल्या बाबतीत झालेला गंभीर अन्याय असून, या प्रभागातील मतदान प्रक्रिया तात्काळ थांबवून निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी शेखर वाकोडे यांनी केली आहे.

Nagpur Municipal Corporation Election 2026: ‘सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहरासाठी मतदान करा’; नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क

न्यायालयात याचिका दाखल करणार

या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रशासनावर टीका केली आहे. तपासे यांनी सांगितले की, राज्यात सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदार यादीत गोंधळ पाहायला मिळत आहे, मात्र टिटवाळ्यात तर हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे थेट उमेदवाराची ओळखच बदलल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणला गेला आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या अन्यायाविरोधात आम्ही शांत बसणार नसून, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणार असल्याचे महेश तपासे यांनी जाहीर केले आहे.

 

Web Title: Tmc election 2026 wrong candidate name on evm in titwala ward 3 shekhar vakode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • TMC Election 2026

संबंधित बातम्या

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर
1

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर

Maharashtra Politics: “… तर पोलिस ठोकून काढतील”; ठाकरेंच्या ‘भगवा गार्ड’वरून फडणवीस संतापले
2

Maharashtra Politics: “… तर पोलिस ठोकून काढतील”; ठाकरेंच्या ‘भगवा गार्ड’वरून फडणवीस संतापले

मतदानापेक्षा मशीनच चर्चेत! PMC निवडणुकीत EVMच्या बिघाडाने लोकशाहीचा खेळखंडोबा”
3

मतदानापेक्षा मशीनच चर्चेत! PMC निवडणुकीत EVMच्या बिघाडाने लोकशाहीचा खेळखंडोबा”

Maharashtra Election Commission: शाईबाबतचा गोंधळ आणि निवडणूक आयोगाचा खुलासा; तीच शाई, जी लोकसभा…
4

Maharashtra Election Commission: शाईबाबतचा गोंधळ आणि निवडणूक आयोगाचा खुलासा; तीच शाई, जी लोकसभा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.