सवलत पास असूनही फास्टॅग खात्यातून पैसे कट; गणेशक्तांची टोलमाफी फसवी?
ठाणे- संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत व जागृत देवस्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला, लोणावळा येथील आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवानिमित्त राज्यभरातून कार्ला येथे येणा-या भाविकांना दरवर्षी टोलमाफी मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री डॉ.एकनाथ शिंदे यांच्याकडे आज निवेदन सादर करून केली. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांसाठी टोलमाफी मिळण्याबाबत आश्वस्त केले तसेच यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील दिल्या. यावेळी खासदार नरेश म्हस्के हे देखील उपस्थित होते.
दिनांक ३, ४ व ५ एप्रिल, २०२५ रोजी कुलस्वामिनी एकविरा देवीचा उत्सव संपन्न होणार आहे. या यात्रोत्सवासाठी ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, पुणे यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण कार्ला येथे येत असतात. आगरी, कुणबी, कोळी, भंडारी समाजासह अनेकजण या चैत्रोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.
या काळात कार्ला येथे आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांचा प्रवास पुणे द्रुतगती महामार्गावरून होतो. दर्शनासाठी येत असताना भाविकांना टोलचा आर्थिक भार सोसावा लागू नये अशी मागणी सातत्याने महाराष्ट्र भरातील भाविकांकडून होत होती. याची दखल घेत मा. स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर यांनी परिपूर्ण अभ्यास केला.
गणेशोत्सवात कोकणवासीयांना तसेच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर यात्रेनिमित्त वारक-यांना जशी टोलमाफी मिळते, त्याचप्रमाणे आई एकविरा देवीच्या चैत्रोत्सवासाठी येणा-या भाविकांच्या वाहनांना दरवर्षी टोलमाफी मिळावी ही संकल्पना संजय देवराम भोईर यांनी मांडली. याच दृष्टीकोनातून आई एकविरा देवीच्या उत्सवासाठी महाराष्ट्रातून येणा-या भाविकांच्या वाहनांना दरवर्षी टोलमाफी मिळावी याकरिता संजय देवराम भोईर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली.
यावेळी शिंदे साहेबांनी या मागणीबाबत संजय भोईर यांच्याशी सखोल चर्चा केली आणि आई एकविरा देवी चैत्रोत्सवानिमित्त येणा-या भाविकांना राज्य सरकारतर्फे पुणे महामार्गावर टोलमाफी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमाकरिता ठोस उपाययोजना राबवण्याच्या देखील सूचना यावेळी शिंदे साहेबांनी दिल्या. यावेळी ठाणे शहर खासदार नरेश म्हस्के, युवासेना ठाणे शहर विधानसभा उपाध्यक्ष विकेश संजय भोईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.