Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

Navarashtra Impact: परिवहन सभापतींच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी भाषेला स्थान न दिल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने समोर आणल्यानंतर अखेर संबंधित निमंत्रण पत्रिकेत बदल करण्यात आला आहे. मराठीला डावलल्याच्या आरोपावरून मराठी एकीकरण समितीनेही आक्रमक भूमिका घेत इशारा दिला होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2026 | 12:15 PM
मराठीला अखेर स्थान...! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

मराठीला अखेर स्थान...! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

Follow Us
Follow Us:
  • नवराष्ट्रच्या बातमीनंतर परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत बदल
  • मराठीला डावलल्याच्या आरोपानंतर पत्रिका बदलली
  • मराठी एकीकरण समितीच्या इशाऱ्याचा परिणाम
विजय काते, मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून निर्माण झालेल्या वादाला अखेर कलाटणी मिळाली आहे. निमंत्रण पत्रिका संपूर्णपणे हिंदी भाषेत प्रसिद्ध करण्यात आल्याने मराठी भाषेला डावलण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर आणि दैनिक नवराष्ट्रने (Navarashtra Impact) हा मुद्दा डिजिटल माध्यमातून ठळकपणे मांडल्यानंतर संबंधित निमंत्रण पत्रिकेत बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुधारित पत्रिकेत मराठी भाषेला स्थान देण्यात आल्याने हा बदल नेमका कोणाच्या दबावामुळे अथवा मागणीनंतर करण्यात आला, यावरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय पदाशी संबंधित कार्यक्रम असल्याने निमंत्रण पत्रिकेत स्थानिक भाषेला, विशेषतः मराठी भाषेला, प्राधान्य असणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. मात्र, सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या पत्रिकेत मराठीचा वापरच नसल्याने मराठी भाषिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. हा केवळ भाषेचा प्रश्न नसून महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक भाषेला दिल्या जाणाऱ्या स्थानाचा प्रश्न असल्याची भूमिका मराठी भाषेच्या समर्थकांकडून मांडण्यात आली.

परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

पत्रिकेतील भाषेपासून नावांच्या क्रमापर्यंत आक्षेप

सुरुवातीच्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ हिंदी भाषेचा वापर करण्यात आल्याने सर्वप्रथम मराठी भाषेला डावलल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पत्रिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नावांचा क्रम आणि काही नावांच्या स्पेलिंगमधील चुका देखील चर्चेत आल्या.

विशेषतः भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे नाव पत्रिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर देण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्याचवेळी लल्लन तिवारी यांचे नाव त्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असल्याने पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नावांचा क्रम ठरवताना प्रोटोकॉलचा विचार करण्यात आला होता का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

महापालिकेतील भाजपचे स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत यांच्या नावातही चूक असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. ‘गहलोत’ऐवजी ‘महलोत’ असा उल्लेख झाल्याने निमंत्रण पत्रिका छपाईपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या नावांची पडताळणी करण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

नवराष्ट्रच्या बातमीनंतर प्रकरणाला मिळाली वेगळी दिशा

निमंत्रण पत्रिकेतील या त्रुटी आणि मराठी भाषेला न दिलेल्या स्थानाबाबत दैनिक नवराष्ट्रने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मराठी एकीकरण समितीनेही या प्रकाराची गंभीर दखल घेत परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्यावर निशाणा साधला. समितीचे उपाध्यक्ष प्रमोद पार्टे यांनी या प्रकाराबाबत आक्रमक भूमिका घेत महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेला प्रथम प्राधान्य देण्याची मागणी केली.

“मीरा-भाईंदर शहरामध्ये जाणूनबुजून मराठीला डावलले जात आहे का? महापालिकेच्या कार्यक्रमात मराठी भाषेला प्रथम प्राधान्य द्यावे. निमंत्रण पत्रिकेतील झालेली चूक तातडीने सुधारून नवीन पत्रिका मराठीत काढावी आणि झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी,” अशी मागणी प्रमोद पार्टे यांनी केली होती.

‘चूक सुधारली नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही’

मराठी एकीकरण समितीने केवळ नाराजी व्यक्त न करता कार्यक्रमाबाबत थेट इशाराही दिला होता. “चूक सुधारली नाही आणि मराठीला योग्य स्थान दिले नाही, तर हा उद्घाटन कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा प्रमोद पार्टे यांनी दिल्याने प्रकरण अधिक तापले होते. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यापूर्वीच निमंत्रण पत्रिका हा राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनला. महापालिका प्रशासन, सत्ताधारी पक्ष आणि संबंधित पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सुधारित पत्रिकेत मराठीला स्थान

दरम्यान, नवराष्ट्रच्या वृत्तानंतर आणि मराठी एकीकरण समितीने भूमिका घेतल्यानंतर परिवहन सभापतींच्या कार्यालयाकडून निमंत्रण पत्रिकेत बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुधारित पत्रिकेत मराठी भाषेला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे मराठी एकीकरण समितीने केलेल्या मागणीचा परिणाम झाला का, असा प्रश्न उपस्थित होत असून समितीच्या भूमिकेला यश आल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या पत्रिकेतील वादग्रस्त बाबींनंतर करण्यात आलेल्या बदलांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘बातमीचा परिणाम की दबावामुळे बदल?’

निमंत्रण पत्रिकेत झालेल्या बदलानंतर आता हा बदल नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, याची चर्चा सुरू झाली आहे. नवराष्ट्रच्या बातमीनंतर आणि मराठी एकीकरण समितीच्या इशाऱ्यानंतर पत्रिका बदलण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणात माध्यमांच्या वृत्तांकनाचा आणि सामाजिक दबावाचा परिणाम झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांमध्ये मराठी भाषेला योग्य स्थान मिळावे, पदाधिकाऱ्यांच्या नावांचा क्रम प्रोटोकॉलनुसार असावा आणि नावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नयेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच निमंत्रण पत्रिकेवरून निर्माण झालेला हा वाद आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सुरुवातीच्या पत्रिकेतील त्रुटींनंतर करण्यात आलेल्या सुधारणांमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी भविष्यात अशा बाबींकडे अधिक गांभीर्याने पाहणार का, याकडे मीरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.

‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर…’, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा

Web Title: Transport chairman invitation card changed after navarashtra news marathi language gets place navarashtra impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • BJP
  • Marathi Language
  • mira bhayandar
  • Navarashtra Impact

संबंधित बातम्या

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
1

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
2

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
3

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस
4

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.