Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?

Transport Employees Salary Hike: गेल्या ११ वर्षांपासून वेतनवाढ झाली नसल्याचा दावा करत परिवहन कर्मचारी संघटनांनी आज काम बंद आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने परिवहन सेवेवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 28, 2026 | 11:17 AM
वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?

वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?

Follow Us
Follow Us:
  • वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक
  • आज काम बंद आंदोलनावर ठाम
  • ११ वर्षांपासून वेतनवाढ नसल्याचा संघटनांचा दावा
 

विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी आज, सोमवार २८ सप्टेंबर रोजी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची मागील आठवड्यात बैठक झाली. मात्र, या बैठकीत मागण्यांवर ठोस तोडगा न निघाल्याने कर्मचारी संघटना आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज शहरातील बससेवा सुरू राहणार की विस्कळीत होणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. (Transport Employees Salary Hike)

मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेमार्फत शहरांतर्गत तसेच ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या विविध मार्गांवर बससेवा चालवली जाते. या सेवेत सुमारे ३०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून, त्यामध्ये प्रामुख्याने चालक आणि वाहकांचा समावेश आहे. सध्या कर्मचाऱ्यांना सुमारे २३ हजार रुपये वेतन मिळत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मागील ११ वर्षांपासून वेतनात वाढ झालेली नसल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे.

Mumbai News: २,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक

दरवर्षी १० टक्के वेतनवाढीची मागणी

वाढती महागाई, कामाचे स्वरूप आणि कर्मचाऱ्यांवर वाढणारा आर्थिक ताण लक्षात घेता दरवर्षी १० टक्के वेतनवाढ करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. याशिवाय प्रवासी भत्त्यात वाढ करावी तसेच अन्य प्रलंबित मागण्यांवरही निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे. कर्मचारी संघटनांनी अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. मात्र, मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

प्रशासनाची भूमिका काय?

दरम्यान, आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर पालिका प्रशासनाने परिवहन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासह विविध भत्ते दिले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच शासनाने लागू केलेल्या वाढीव दरानुसार दर सहा महिन्यांनी विशेष भत्ताही दिला जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. साप्ताहिक सुट्टीचे वेतनही मूळ वेतनामध्ये समाविष्ट केले जाते, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शासनाकडून मूळ वेतनात वाढ करण्यात आलेली नसल्याने पालिकेनेही मूळ वेतनात स्वतंत्र वाढ केलेली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी प्रस्तावित आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पोलिसांना पत्र; कंत्राटदाराकडून नोटिसा

आंदोलनामुळे बससेवा विस्कळीत होऊन प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने पोलिसांना पत्र देऊन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची विनंती केल्याचे समजते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना आंदोलनाबाबत कंत्राटदारामार्फत नोटिसाही बजावण्यात आल्याची माहिती आहे. आंदोलन केल्यास नियमानुसार कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

मात्र, प्रशासनासोबत बैठक होऊनही मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने कर्मचारी संघटना आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात किती कर्मचारी कामावर हजर राहतात आणि परिवहन सेवा कितपत सुरू राहते, यावर शहरातील वाहतुकीचे चित्र अवलंबून आहे. आंदोलन झाल्यास दररोज बससेवेवर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागू शकतो. यापूर्वीही परिवहन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याने यावेळी प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम प्रवाशांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

Web Title: Transport employees strike over salary hike workers firm on work stoppage protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • maharashtra
  • transport

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
1

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू
2

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड
3

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
4

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.