Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Traffic Jam : वाहतूक कोंडीने गाठली परिसीमा! रुग्णालय गाठण्याआधीच रिक्षेत महिलेची प्रसूती

Ulhasnagar Traffic Jam : उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडीचा गंभीर परिणाम समोर आला असून, वाहतूक कोंडीत रिक्षा अडकल्याने गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचता आले नाही. अखेर डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने रिक्षातच महिलेची प्रसूती करण्यात आली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 06, 2026 | 06:10 PM
वाहतूक कोंडीने गाठली परिसीमा! रुग्णालय गाठण्याआधीच रिक्षेत महिलेची प्रसूती

वाहतूक कोंडीने गाठली परिसीमा! रुग्णालय गाठण्याआधीच रिक्षेत महिलेची प्रसूती

Follow Us
Follow Us:
  • नागरिकांना रस्त्यावर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष  
  • रुग्णवाहिकेच्या चालकांनी रुग्णालयात धाव घेतली  
  • महिला व बाळाची तब्येत ठणठणीत 
Ulhasnagar Traffic Jam : उल्हासनगर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक कोंडीत रिक्षा अडकल्याने एका गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचता आले नाही आणि अखेर रिक्षा मध्येच तिची प्रसूती झाल्याची घटना घडली. प्रसूतीनंतर बाळ आणि बाळंतीण यांना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मात्र, या घटनेमुळे उल्हासनगर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापालिका असलेल्या शहरात नागरिकांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा इतका मोठा त्रास सहन करावा लागत असेल, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव

नागरिकांना रस्त्यावर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष

एकीकडे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि आपापसातील वाद सुरू आहेत; मात्र दुसरीकडे सामान्य नागरिकांना रस्त्यावर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आपापसात भांडणाऱ्या राजकारण्यांनी आता राजकीय वाद बाजूला ठेवून शहराची ही अवस्था पाहावी आणि नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

उल्हासनगर शहरात वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येमुळे एका महिलेला रुग्णालयात वेळेत पोहोचणे अशक्य झाल्याने या महिलेला रिक्षामध्येच आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. उल्हासनगरमधील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढती वाहतूक कोंडी सर्वसामान्यांच्या जीवावर कशी बेतत आहे, याचे हे एक विदारक उदाहरण आहे.

या घटनेचा स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सुदैवाने, प्रसूतीनंतर माता आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याचे समजते आहे.

रुग्णवाहिकेच्या चालकांनी रुग्णालयात धाव घेतली

रुग्णवाहिकेच्या चालकांनी रुग्णालयात धाव घेतली , डॉक्टर आणि नर्स यांना माहिती दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून
डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनी गरोदर महिलेची परिस्थिती बघून रिक्षातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. ही
घटना गुरवारी पहाटे साडे तीन वाजताची आहे.

महिला व बाळाची तब्येत ठणठणीत

रुग्णालयातील महिला इंटन डॉक्टर, परिचारिका लागलीच तत्परता दाखवून सदर महिलेची प्रसुती रिक्षात यशस्वी झाली.रिक्षातील त्या महिलेने बाळास जन्म दिला. यावेळी रुग्णालयाचे वार्डबॉय धीरज सितापारा आणि खाजगी अॅम्बुलन्स चालक विशाल शेलार यांनी त्या महिलेस प्रसूती वॉर्ड पर्यंत स्ट्रेचरवरून घेऊन गेले. महिला व बाळाची तब्येत ठणठणीत असल्याचीमाहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

💡

Frequently Asked Questions

  • Que: उल्हासनगरमध्ये गर्भवती महिलेची प्रसूती कुठे झाली?

    Ans: वाहतूक कोंडीत रिक्षा अडकल्यानंतर महिलेची रिक्षामध्येच प्रसूती झाली.

  • Que: प्रसूतीवेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काय केले?

    Ans: डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत रिक्षातच प्रसूती करण्यास मदत केली आणि त्यानंतर महिला व बाळाला प्रसूती वॉर्डमध्ये नेण्यात आले.

Web Title: Ulhasnagar traffic jam pregnant woman delivers baby in rickshaw sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Traffic
  • Ulhasnagar
  • Ulhasnagar Hillline Police Station
  • Ulhasnagar News

संबंधित बातम्या

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
1

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
2

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

BJP-Shiv Sena Conflict : भाजप-शिवसेना संघर्ष तीव्र ! नगरसेवक निवडीवरून भाजप आक्रमक, युतीतून बाहेर पडण्याची घोषणा
3

BJP-Shiv Sena Conflict : भाजप-शिवसेना संघर्ष तीव्र ! नगरसेवक निवडीवरून भाजप आक्रमक, युतीतून बाहेर पडण्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.