Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : महिला व अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांवर महिला आयोग गंभीर; मीरा-भाईंदर पोलिसांना नोटीससदृश निर्देश

मीरा-भाईंदरमधील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. काशिमीरा पोलिसांसह संबंधित यंत्रणांना तातडीने आणि संवेदनशीलतेने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2026 | 12:05 PM
महिला व अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांवर महिला आयोग गंभीर; मीरा-भाईंदर पोलिसांना नोटीससदृश निर्देश

महिला व अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांवर महिला आयोग गंभीर; मीरा-भाईंदर पोलिसांना नोटीससदृश निर्देश

Follow Us
Follow Us:
  • महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत राज्य महिला आयोगाचे पोलीस आयुक्तांना कडक निर्देश
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश
  • मीरा-भाईंदर पोलिसांना नोटीससदृश निर्देश
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात महिला व अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त तसेच काशिमीरा पोलीस ठाण्याला तातडीने आणि संवेदनशीलतेने योग्य ती कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

शिवसेना जिल्हा संघटक निशा नरेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १५ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे यासंदर्भात निवेदन सादर केले होते. या निवेदनात काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक ०२७८/२०२६ मध्ये गैरअर्जदार राजेश चव्हाण याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, त्याच्याविरोधात पोक्सो (POCSO) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai : मनसेच्या अल्टिमेटमपूर्वीच नरेंद्र मेहतांनी केला बॉटलनेक ब्रिजचा लोकार्पण सोहळा

निवेदनात नमूद केल्यानुसार, सद्यस्थितीत पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीतील एका नगरसेविकेकडून आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे (भा.प्र.से.) यांनी संबंधित यंत्रणांना कठोर शब्दांत सूचना दिल्या आहेत. मिरा-भाईंदरसारख्या विकसित आणि नागरीकरण झालेल्या परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनणे आणि गुन्ह्यांच्या तपासावर राजकीय दबाव आणला जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ मधील कलम १२ अंतर्गत या संपूर्ण प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल (Action Taken Report – ATR) पुढील दोन आठवड्यांच्या आत आयोगाकडे सादर करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. महिला व बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयोगाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित प्रकरणातील तपास प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोगाच्या निर्देशांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mira-Bhayandar: अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण रॅकेटचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार जेरबंद

Web Title: Women commission takes serious note of rising sexual crimes in mira bhayandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • crime
  • maharashtra
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.