मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी काल, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
दरम्यान अशातचं मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने फडणवीस नाराज आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
बिचारे देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला !#Maharashtra — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 30, 2022
प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलं होतं की, ” बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला ! असा खोचक टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे. तसेच “चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का?” असा खोचक सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.
चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत.मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले.एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते.देवेंद्र फडणवीसांचा बळी का?#WeSympathiseWithDevendraFadanvi @Dev_Fadnavis @AmitShah — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 1, 2022
प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले म्हणून असं ट्विट मी केलं आहे. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं. सरकार वर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते ना. ११ तारखेला पीटिशन सेनेकडे गेलं तर आपली नामुष्की होऊ नये म्हणून फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं असावं.
[read_also content=”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ बैठक, कोणते निर्णय घेतले? : वाचा एका क्लिकवर https://www.navarashtra.com/maharashtra/cabinet-meeting-chaired-by-chief-minister-eknath-shinde-what-decisions-were-taken-read-with-one-click-nrdm-299211/”]
दरम्यान शिवसेनेतल्या बंडखोरीबद्दलही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावा लागेल. वेगळा गट जो झाला आहे ते ही आज शिवसेना आमची आहे असं म्हणत आहेत. जो व्हीप काढण्यात आला होता त्याचं उल्लंघन करण्यात आलं. माझ्या मते ते पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये बसत आहे असं वाटतं. ११ जुलैला विश्वासदर्शक ठराव होईल असं वाटतं. गटनेत्याला कुठलाही अधिकार नसतो. राज्यपालांना ज्या वेळी वाटतं की या सरकारला बहुमत नाही तेव्हा ते विरोधी पक्षाला विचारू शकतात त्यामुळे हे चुकीचे वाटत नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.