Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासगी रूग्णालयात पडून असलेल्या कोरोना लसीच्या पेच कायम!, दोन्ही न्यायमूर्तीमध्ये एकमत नाही; याचिकेची सुनावणी तिसर्‍या न्यायामूर्तींसमोर होणार

ही लस परत घेण्याचे राज्य सरकारवर बंधन नसले तरी राष्टीय संपत्तीचा तसेच आतंराष्ठ्रीय वैद्याकिय संशोधनाचा अपव्यय आहे. त्याची नैतिक जबाबदारीही सरकारवर असल्याने राज्य सरकार ती झटकू शकत नाही. असे मत न्या. जामदार यांनी मांडले. निर्णय देताना दोन्ही न्यायमूर्तींनी स्वतत्र निर्णय दिला.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 16, 2022 | 07:38 PM
खासगी रूग्णालयात पडून असलेल्या कोरोना लसीच्या पेच कायम!, दोन्ही न्यायमूर्तीमध्ये एकमत नाही; याचिकेची सुनावणी तिसर्‍या न्यायामूर्तींसमोर होणार
Follow Us
Follow Us:

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसींचा (Corona Vaccination) राज्यासह केंद्र सरकारकडेही तुटवडा (Shortage Also At Central Government) जाणवत असताना खासगी केंद्राकडे पडून असलेल्या लसीचे काय करायचे? यावर उच्च न्यायालयात तोडगा निघु शकला नाही. एकीकडे लसीबाबत राज्य सरकारने हात झटकले तर दोन न्यायमूर्तींमध्ये एक मत न झाल्याने याचिका अन्य खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली.

कोरोना विषाणूविरोधात केंद्र सरकारकडून देणाऱ्या येणाऱ्या प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस राज्य सरकारकडून मोफत देण्यात येतात. दुसरीकडे, खासगी केंद्र आणि रुग्णालयात निश्चित करण्यात आलेल्या रक्कमेवर लस देण्यात येते. त्यामुळे लोकांचा कल हा खासगीपेक्षा सरकारी केंद्रावर जास्त असतो. त्यातच कोरोना प्रतिबंधक लसींची एक विशिष्ट मुदत असते. त्यामुळे खासगी केंद्रावरील अनेक लसी या वाया जाऊ नये आणि त्याचा लाभ वंचितांना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका महालक्ष्मी निसर्गोपचार आणि योगा रुग्णालय संशोधन केंद्राच्यावतीने ॲड. युवराज नरवणकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर नुकतची न्या. गौतम पटेल आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

खंडपीठाने याचिकेची गंभर दखल घेत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देष दिले होते. मात्र, सुनावणीदरम्यान सरकारच्यावतीने सरकारी वकील अ‍ॅड. आर एस.कदम यांनी हात झटकत लस घेण्यास परत असमर्थता दर्शविली. खासगी पुरवठादारांकडील लस कोणत्या स्वरूपात अथवा कशा पध्दतीने साठवणूक करू ठेवली आहे ते आम्हाला माहिती नसल्यामुळे लस परत घेण्याबाबत मोठी समस्या आहे. तसेच अशी लस परत घेण्याचे सरकारवर कोणतेही बंधन नाही आणि या लसीसाठी सरकारी तिजोरीवर भार का टाकावा? असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. त्यावर अ‍ॅड. नरवणकर यांनी जोरदार आक्षेप घेत सरकार ज्या कंपन्यांकडून लस घेते त्याच कंपन्यांकडून ती घेण्यात आली असल्यामुळे सरकारने ही लस कंपन्याऐवजी आमच्याकडून खरेदी करावी. कंपन्यापेक्षा कमी दरात आम्ही द्यायला तयार आहोत असे स्पष्ट केले.

लस परत घेण्यावरून न्यायमूर्तींमध्ये शाब्दिक द्वंद्व

कोरोना प्रतिबंधित लसी शिल्लक असल्यास ती परत घेण्याचे राज्य सरकारवर कोणतही बंधन नाही आणि कायदेशीर पुरावे नाहीत अथवा परीपत्रकही नसल्याने याचिका फेटाळत असल्याचे स्पष्ट केले. तर खासगी पुरवठादारांकडील पडून असलेल्या लसींचे काय करायचे असा पेच निर्माण होत असेल तर न्यायालयालात्यात हस्तक्षेप करून निर्देश देता येतात.

ही लस परत घेण्याचे राज्य सरकारवर बंधन नसले तरी राष्टीय संपत्तीचा तसेच आतंराष्ठ्रीय वैद्याकिय संशोधनाचा अपव्यय आहे. त्याची नैतिक जबाबदारीही सरकारवर असल्याने राज्य सरकार ती झटकू शकत नाही. असे मत न्या. जामदार यांनी मांडले. निर्णय देताना दोन्ही न्यायमूर्तींनी स्वतत्र निर्णय दिला. यावेळी वरिष्ठ आणि कनिष्ठ असा शाब्दिक द्वंद्व दोन्ही न्यायमूर्तींमध्ये निर्णय देताना पाहायला मिळाले. दोन्ही न्यायामूर्तीमध्ये एकमत न झाल्याने अखेर याचिका आता तिसर्‍या न्यायमूर्तीसमोर सुनावणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

मात्र, लसींचा या गंभीर प्रश्नावर तातडीने निर्णय होणे अपेक्षीत आहे. अन्यथा मार्च २०२२ मध्ये मुदत संपणार्‍या या लसीचे करायचे काय ? हा प्रश्न अनुत्तरीच राहील.

Web Title: The corona vaccine issue lying in a private hospital remains the two judges disagree the petition will be heard before a third judge nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2022 | 07:38 PM

Topics:  

  • Corona Vaccine
  • High court
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल
1

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल

निलंबित एपीआयच्या  आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?
2

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ
3

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
4

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.