Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेच्या महिला शहर अध्यक्ष यांचा मृत्यू, मात्र धक्कादायक खुलासानंतर रहस्य कायम

घरगुती गॅसच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत मनसे शहर अध्यक्षा शीतल विखणकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. पंधरा तारखेला दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 21, 2023 | 12:31 PM
मनसेच्या महिला शहर अध्यक्ष यांचा मृत्यू, मात्र धक्कादायक खुलासानंतर रहस्य कायम
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण-अमजद खान : मनसे कल्याण शहर अध्यक्ष शीतल विखणकर यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आधी विखणकर या त्यांच्या कल्पेश अपार्टमेंट या राहत्या घरी जळाल्या होत्या अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहे की भिवंडी कोणगाव येथील एका घरात त्या जळाल्या होत्या. या घटनेत त्यांच्या ड्रायव्हर अविनाथ पाटील त्या घरात होता. पोलीस तपासा दरम्यान ही घटना कोणगाव येथील घरी झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. सध्या हे प्रकरण भिवंडी कोनगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

घरगुती गॅसच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत मनसे शहर अध्यक्षा शीतल विखणकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. पंधरा तारखेला दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात होते. विखनकर यांना उपचारासाठी आधी भिवंडी येथील वेद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथून त्यांना ऐरोली येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. या घटनेत विखणकर 80% भाजल्यानें त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर विखणकर यांची प्राणजोत मावळली. दरम्यान या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ही घटना कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील कल्पेश अपार्टमेंट या विखणकर यांच्या राहता घरी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती .

मात्र आता ही घटना भिवंडी कोनगाव हद्दीतील एका इमारतीमधील घरात घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. ही घटना घडली तेव्हा त्यांचा ड्रायव्हर स्वीय सहाय्यक अविनाश पाटील हा त्या घरात होता. त्यानेच विखंकर यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान हे प्रकरण भिवंडी कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण आता कोनगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे खडकपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले. या धक्कादायक खुलासामुळे नेमकी काय घटना घडली होती आणि ती कशी घडली होती याबाबत आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत शितल विखणकर गेल्या दहा वर्षापासून शहर अध्यक्ष या पदावर होत्या 15 वर्षापासून त्या राजकारणात सक्रिय होत्या.

Web Title: The death of mnss female city president remains a mystery after a shocking revelation kalyan crime case dombivli crime case maharashtra police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2023 | 12:31 PM

Topics:  

  • dombivli crime case
  • kalyan crime case
  • Kalyan Police
  • thane

संबंधित बातम्या

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
1

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
2

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
3

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?

Thane News : “दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना…”, जितेंद्र आव्हाडांचा इशारा
4

Thane News : “दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना…”, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.