माथेरान वाहनतळचा विस्तार, विकेंडमध्ये होणारी वाहतूक कोंडींची होणार समस्या दूर
माथेरान: माथेरान या पर्यटन स्थळी येणारे पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे माथेरान शहराचा वाहनतळ असलेल्या दस्तुरी येथील पार्किंग फुल होत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पर्यटक हे माथेरान शहरात न येता घरी परतत होते. त्यामुळे वाहनतळ येथील डिफोरेस्ट भागातील रस्ता श्रमदान करून मोकळा करण्यात आला. माथेरानचे संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांनी सर्व राजकीय पक्ष तसेच टॅक्सी संघटना,वन विभाग आणि माथेरान नगरपरिषद यांना श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज श्रमदान करून एकावेळी १०० वाहने उभी राहू शकतील अशी जागा निर्माण करण्यात आली.
माथेरान हे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी विविध भागातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात.तर मुंबईपासून अगदी जवळचे पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी येतात. तसेच पावसाळे पर्यटन वाढल्यामुळे या ठिकाणी माथेरान मध्ये पार्किंगचे समस्या उद्भवत आहे.त्यामुळे जे पर्यटन फिरण्यासाठी येतात त्यांना पार्किंगसाठी आपल्या स्वतःच्या कार या माथेरान घाट रस्त्यात लावून माथेरानला जावे लागते. यामुळे माथेरान वन समिती आणि सर्व पक्षीय राजकीय पुढारी यांनी पुढाकार घेऊन माथेरान येथे असलेल्या डी फॉरेस्ट रस्त्यामध्ये असलेले बारीक पार्किंग हाटून त्या ठिकाणी चार चाकी पार्किंग करण्याचा पुढाकार घेतला. यामुळे माथेरान पार्किंग मध्ये जी पार्किंग होते त्यामध्ये पाचशे ते साडेपाचशे वाहने पार्क केली जात होते.परंतु या पार्किंगमुळे माथेरानमध्ये आणखी 200 ते 250 वाहने पार्क होऊ शकतात असे वन समिती आणि सर्वपक्षीय राजकीय पुढारी यांच्याकडून बोलण्यात आले.
माथेरान पावसाळी पर्यटन हंगाम दरवर्षी जोरात असतो प्रत्येक विकेंडला अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे घाट जाम होतो.अनेक पर्यटकांचा हिरमोड होऊन माघारी जावे लागते आणि त्यामुळे पर्यटक नाराज होतात. दस्तुरी येथील वाहनतळ भागातील डिफोरेस्ट भागातील रस्त्यावर पडलेला कचरा आणि दगड यांचे श्रमदान करण्यासाठी माथेरान मधील सर्व राजकीय पक्षांचे नेते,नगरपरिषद कर्मचारी,वन अधिकारी कर्मचारी,नेरळ माथेरान टॅक्सी संघटना कार्यकर्ते आदी यांनी श्रमदानात सहभाग घेतला.
पावसाळी हंगाम वाढल्यामुळे माथेरानला पर्यटकांचे गणपती पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी या पर्यटकांना वाहने पार करण्यासाठी जागा पुरेसा असतो. त्यामुळे वन समिती आणि सर्वपक्षीय पुढारी यांनी माथेरान येथील डी फॉरेस्ट या जागेमध्ये पार्किंगला सुविधा उपलब्ध करून दिली आहे.यामध्ये 200 ते 250 गाड्या पार्क होऊ शकतात असा वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश जाधव यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यामध्ये माथेरानमध्ये पर्यटकांचे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली त्यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना आपले वाहने गाठ रस्त्यात लावावी लागली होती. त्यामुळे ही लाईन दीड ते अडीच किलोमीटर पर्यंत गेले माथेरानमध्ये पार्किंगची समस्या उद्भवत असताना माथेरान वन समिती आणि माथेरान सर्वपक्षीय पुढाकार यांनी यावर निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती योगेश जाधव यांनी दिली.