Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या यादीत नाव न आल्याने भाजप इच्छुकांची वाढली धाकधूक; वरिष्ठांच्या भेटीगाठी वाढल्या

उमेदवारी मिळण्यात अनिश्चितता असल्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार आता दुसऱ्या यादीत आपले नाव असावे, यासाठी प्रयत्नशील आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 22, 2024 | 07:17 AM
Photo Credit- Social Media

Photo Credit- Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यात भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या यादीत नाव नसलेल्या आणि दुसऱ्या यादीसाठी वेटींगवर ठेवण्यात आलेल्या 16 विद्यमान आमदारांची धाकधूक आता वाढली आहे. त्यामुळे वेटींगवर असलेल्या आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रिघ लागली आहे.

उमेदवारी मिळण्यात अनिश्चितता असल्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार आता दुसऱ्या यादीत आपले नाव असावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपाने पाच दिवसांनी आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. या यादीत एका विद्यमान आमदाराचा पत्ता कट करत ८९ जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर ४ विद्यमान आमदारांऐवजी त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली.

भीमराव तापकीर, सुनील कांबळे ‘वेटिंग’वर…

भाजपाने पहिली यादी जाहीर करताना पेण मतदारासंघातून रवीशेठ पाटील, पुणे खडकवासला येथून भीमराव तापकीर, कंटोंटमेंट मतदारसंघातून सुनील कांबळे, पंढरपूर येथून समाधान आवताडे, माळशिरस येथून राम सातपुते, अकोट येथून प्रकाश भारसाकळे, मुर्तिजापूर येथून हरिष पिंपळे, वाशिम येथून लखन मलिक या आमदारांना वेटींगवर ठेवले आहे. यापैकी आता काही आमदारांकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना गळ घालण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

तिकीटासाठी प्रयत्न

खडकवासला मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे सोमवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोहचले. यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधातील भाजपचे इच्छुक उमेदवार बाळा भेगडे हेदेखील फडणवीसांच्या भेटीसाठी पोहचले.

Web Title: The fear of bjp aspirants increased as the name did not appear in the first list nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 07:14 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Mahaharashtra Politics
  • political news
  • Vidhan sabha

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
2

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले
3

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले

BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू?
4

BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.