Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला १५ ऑगस्टचा मुहूर्त

मुंबई ते नागपूर दरम्यान हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्पनेतील हा प्रकल्प आहे. सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग असून एकूण सहा मार्गिका आहेत. सुमारे ५५ हजार कोटी रुपये यासाठी खर्च केला जाणार आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 10, 2022 | 03:40 PM
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला १५ ऑगस्टचा मुहूर्त
Follow Us
Follow Us:

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या २१० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होईल, या प्रतीक्षेत असताना शिंदे – फडणवीस सरकारचा मात्र निर्णय अधांतरीच आहे. येत्या १५ ऑगस्टला हा टप्पा सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. एमएसआरडीसीला अद्याप कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे समृद्धी महामार्ग राज्य सरकार खुला कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मुंबई ते नागपूर दरम्यान हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्पनेतील हा प्रकल्प आहे. सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग असून एकूण सहा मार्गिका आहेत. सुमारे ५५ हजार कोटी रुपये यासाठी खर्च केला जाणार आहे. १० जिल्ह्यातून, २६ तालुके आणि ३९२ गावातून जाणारा हा महामार्गावर २४ ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. या मार्गामुळे हे अंतर अवघ्या सात तासात पार करता येईल. व्यवसाय, उद्योग आणि व्यापाराला यामुळे चालना मिळणार आहे. सध्या शिर्डी ते नागपूर हा २१० किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा महामार्ग खुला करण्याच्या वारंवार तारखा सांगण्यात आल्या. लवकरच हा महामार्ग खुला करुन नागपूरकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. अद्याप हा मार्ग खुला झालेला नाही.

समृद्धी महामार्ग खुला करण्यासाठी आता १५ ऑगस्टचा मुहूर्त देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केली आहे. मात्र, एमएसआरडीसीला अद्याप यासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. सध्या २१० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम पूर्ण आहे. सरकारच्या सूचना आल्यास महामार्ग खुला करण्याची तयारी करू, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने दिली.

Web Title: The first phase of samriddhi highway is scheduled for august 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2022 | 03:40 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Shinde Fadnavis Govt

संबंधित बातम्या

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
1

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
2

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
3

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी
4

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.