Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus News: एसटीच्या सवलत मूल्य प्रवासी संख्येवर सरकारची शंका, एसटी कर्मचारी काँग्रेसची टीका

एसटी सारख्या शासनाचा उपक्रम असलेल्या संस्थेने दिलेल्या आकडेवारीवर शंका उपस्थित करण्याची नामुष्की सरकावर ओढवली असून सद्या सुरू असलेल्या ऑडिटवर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी टीका केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2025 | 06:09 PM
एसटीच्या आरक्षणाला पसंती

एसटीच्या आरक्षणाला पसंती

Follow Us
Follow Us:

मुंबई : एसटी महामंडळ वेगवेगळ्या ३१ प्रकारच्या सवलती प्रवाशांना देत असून त्याचा परतावा सरकारकडून एसटीला करण्यात येत आहे. पण सरकारच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी सवलतीच्या प्रवासी संख्येवर शंका उपस्थित केली असून या प्रवासी संख्येचे व सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेचे सद्या ऑडिट सुरू करण्यात आले आहे. एसटी सारख्या शासनाचा उपक्रम असलेल्या संस्थेने दिलेल्या आकडेवारीवर शंका उपस्थित करण्याची नामुष्की सरकावर ओढवली असून सद्या सुरू असलेल्या ऑडिटवर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी टीका केली आहे. विविध सवलतींची प्रतिपूर्ती रक्कम देण्याची ऐपत सरकारची राहिली नसल्याने बहाणे शोधले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून “सरकार तुझा एसटीवर भरोसा नाही का?”अशी मिस्किल टोलाही बरगे यांनी सरकारला लगावला आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा…; मुख्य सचिवांनी दिले आदेश

एसटी महामंडळ प्रवाशांना विविध प्रकारच्या ३१ सवलती देत असून त्या रकमेचा परतावा सरकारकडून एसटीला करण्यात येत आहे. एसटीची प्रवासी संख्या दिवसाला साधारण ५२ ते ५५ लाख इतकी असून एकूण प्रवाशांच्या तुलनेत साधारण ४५ टक्के इतके प्रवासी व तेवढेच टक्के उत्पन्न एसटीला विविध प्रकारच्या सवलती मधून मिळत आहे.महिन्याला अंदाजे ३६० ते ४०० कोटी रुपये इतकी रक्कम सवलत मूल्य प्रतिपूर्तीची होत असून या रक्कमेचा परतावा सरकारकडून एसटीला करण्यात येत आहे .ही परतावा रक्कम म्हणजेच प्रतिपूर्ती रक्कम सरकार कडून एसटीला कधीच पूर्णतः दिली जात नाही.

साधारण एक हजार कोटी रुपये इतकी रक्कम आजही सरकार कडून एसटीला येणे बाकी आहे. दर महिन्याला एसटीकडून मागणी करण्यात येत असलेली सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम व प्रवाशांची संख्या बरोबर आहे का? अशी शंका सरकार कडून उपस्थित करण्यात आली असून आता या रकमेचे ऑडिट सुरू करण्यात आले आहे. एसटी मध्ये वर्षानुवर्षे आगार, विभाग व मध्यवर्ती कार्यालय स्थरावर ऑडिट करण्यात येत असून त्या नंतर गव्हरमेंट ऑडिट सुद्धा करण्यात येते.त्या मुळे एसटीत आर्थिक अनियमिततेचे प्रमाण शून्य टक्के असून अशा चार स्थरावर ऑडिट होत असलेल्या इतक्या मोठ्या,जुन्या व विश्वासाहर्य संस्थेवर शंका उपस्थित केली जात असून सवंग लोकप्रियतेसाठी सरकारने प्रवाशांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती जाहीर केल्या असून सरकारच्या तिजोरीत आता खडखडाट निर्माण झाला असल्याने ही रक्कम सरकार एसटीला पूर्णपणे देऊ शकत नाही. पैसे देण्याची ऐपत व कुवत राहिली नसल्याने अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी ऑडिट सारखे चाळे सुरू केले असल्याची खरमरीत टीकाही बरगे यांनी केली आहे.

सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशावरुन राजकारण तापलं; काँग्रेसने विचारला ‘हा’ संतप्त सवाल

Web Title: The government doubts the number of passengers benefiting from the st concession criticism from st employees congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

ST Employees: अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी
1

ST Employees: अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार
2

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
3

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.