Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावती शहरात जीर्ण इमारतींची समस्या! मनपाने उपाययोजना कराव्या; पावसाळ्यापूर्वी मोठ्या दुर्घटनेची भीती

एकवीरा देवी संस्थानची सुमारे १०० वर्षे जुनी इमारत तसेच त्याच परिसरातील ८० वर्षे जुनी दुसरी इमारत यांनाही २३ जून २०२५ रोजी नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2026 | 03:30 PM
अमरावती शहरात जीर्ण इमारतींची समस्या! मनपाने उपाययोजना कराव्या; पावसाळ्यापूर्वी मोठ्या दुर्घटनेची भीती

अमरावती शहरात जीर्ण इमारतींची समस्या! मनपाने उपाययोजना कराव्या; पावसाळ्यापूर्वी मोठ्या दुर्घटनेची भीती

Follow Us
Follow Us:

मे महिन्याचा एक आठवडा उलटून गेला असून आगामी महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. मात्र शहरातील अनेक उंच इमारती आतून अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभ्या आहेत. विशेषतः राजापेठ परिसरात अशा इमारतींची संख्या सर्वाधिक असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: कापसाच्या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना! कवडीमोल विक्री, नंतर दरवाढ; शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

राजापेठ झोनमध्ये सध्या किमान १४ अत्यंत जीर्ण इमारती अद्याप उभ्या असून त्यापैकी ३ इमारती तब्बल १०० वर्षे जुन्या असल्याची माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेने संबंधित मालकांना नोटिसा बजावून आपली जबाबदारी पूर्ण केल्याचे दिसत असले; तरी प्रत्यक्षात या इमारतींच्या पाडकामाबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. राजापेठ उड्डाण पुलालगत असलेली गोदावरीबाई देविदास झाडे यांची सुमारे ७० वर्षे जुनी इमारत सर्वाधिक धोकादायक मानली जात आहे. या इमारतीच्या खालच्या मजल्यांवर अजूनही काही व्यावसायिक आस्थापने सुरू आहेत. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक येथे ये-जा करतात. तरीही या धोकादायक इमारतीबाबत महापालिकेने कोणतीही कठोर पावले उचललेली नाहीत.

एकवीरा देवी संस्थानची सुमारे १०० वर्षे जुनी इमारत तसेच त्याच परिसरातील ८० वर्षे जुनी दुसरी इमारत यांनाही २३ जून २०२५ रोजी नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. याशिवाय राजकमल चौकातील गिरीश मेहता यांची १०० वर्षे जुनी इमारत, हार्वे सभापती कंपाउंडमधील बाबाराव कोंडलवार यांची ८० वर्षे जुनी इमारत, तसेच जयस्तंभ चौकातील दंडे बिल्डिंग या इमारतींनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. दंडे बिल्डिंगला २७ नोव्हेंबर २०२४ रोजी नोटीस देऊन पाडण्याचे आदेश दिले असले तरी ती अद्याप उभी आहे. पावसाळ्यात या इमारती कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन

तख्तमाल इस्टेट व्यावसायिक संकुलात असलेली सारंगपाणी श्रीरंग चांडक यांची सुमारे ७० वर्षे जुनी इमारतदेखील अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. कपड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या या संकुलात दररोज हजारो ग्राहक, विशेषतः महिला व मुले येतात. तरीही महानगरपालिकेने या इमारतीबाबत केवळ नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई केलेली नाही. पावसाळ्यात ही इमारत कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रभात टॉकीजजवळील राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावर असलेल्या राजदीप कलेक्शन दुकानाला महापालिकेने ‘सी-१’ म्हणजे अत्यंत जीर्ण इमारत म्हणून घोषित केले होते, निर्जंतुकीकरण करून वीजपुरवठाही बंद करण्यात आला होता, मात्र दुरुस्तीला परवानगी दिल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पाडकाम सुरू असतानाच दुकानाचा स्लॅब कोसळून ६ कामगारांचा मृत्यू झाला होता. एवढी गंभीर घटना घडूनही जीर्ण इमारतींबाबत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची टीका होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The problem of dilapidated buildings in amravati city municipality should take measures fear of major disaster before monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • amaravati news
  • amravati
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.