Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : अखेर ठाणेकरांची प्रतीक्षा संपली ;  गडकरी रंगायतनात वाजली तिसरी घंटा

ग़डकरी रंगायतन हे फक्त कलाकारांसाठीच नव्हे तर ठाणेकर रसिकांसाठी देखील महत्वाचं आहे. अशातच आता या रंगायतनाचं अंतिम टप्प्यात असलेलं काम देखील आता पुर्णत्वास गेलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 15, 2025 | 06:45 PM
Thane News : अखेर ठाणेकरांची प्रतीक्षा संपली ;  गडकरी रंगायतनात वाजली तिसरी घंटा
Follow Us
Follow Us:

ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या वास्तूचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात सुरु होतं. या नुतनीकरणाबाबत अनेक कलाकरांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ग़डकरी रंगायतन हे फक्त कलाकारांसाठीच नव्हे तर ठाणेकर रसिकांसाठी देखील महत्वाचं आहे. अशातच आता या रंगायतनाचं अंतिम टप्प्यात असलेलं काम देखील आता पुर्णत्वास गेलं आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राम गणेश गडकरी रंगायतन ठाणेकरांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असून ठाणे शहराला गडकरी रंगायतन शिवाय ठाण्याला शोभा नाही, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम गणेश गडकरी रंगायतनाच्या लोकार्पण प्रसंगी मांडले.स्वातंत्र्य दिनाचे ओचित्य साधत शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतनची तिसरी घंटा वाजली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नूतनिकृत वास्तूचे लोकपर्ण करण्यात आले. गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजून पडदा बाजूला जातोय याचा विशेष आनंद वाटत असल्याची भावना यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

राम गणेश गडकरी रंगायतनच्या उभारणी मध्ये ठाणेकरांचे मोठे योगदान आहे. गडकरी रंगायतन हे कलावंतांचे अविभाज्य भाग आहे. ही एक बिल्डिंग नसून ती एक जिवंत वास्तू असून ठाण्याचे हृदय असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी राजकीय इच्छा शक्ती देखील असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.गडकरी रंगायतन सुरु होण्याची ठाणेकर रसिक जवळपास वर्षभर वाट पाहत होते, व्यासपीठ सुन्न होते, पडदा बंद होता, अखेर आज या वास्तूची तिसरी घंटा वाजली. नाट्य गृहाची दुरुस्ती करत असताना नाट्य कलावंतांच्या आणि कलाप्रेमीच्या सूचना महत्वाच्या होत्या. त्यामुळेच दुरुस्तीला काहीसा वेळ लागला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

या नाट्यगृहत अनेक नाटके झाली, तालीम झाल्या अनेक कलावंत घडले आणि याच ठिकाणी राजकीय सभा देखील झाल्याचे सांगत शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडकरी रंगायतनमध्ये अजूनही काही उणिवा असतील तर सांगा, गडकरी रंगायतनसाठी निधीची कमरतरता कधी पडू देणार नाही असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The renovation of ram ganesh gadkari rangayatana has been completed what did eknath shinde say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब
1

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी
2

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.
3

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
4

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.