Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Debt of Maharashtra: राज्याच्या तिजोरीवर तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; आकडा वाचून भरेल धडकी

राज्याचे दरडोई उत्पन्नही वाढले असून २०२५-२६ साठी ते ३ लाख ४७ हजार ९०३ रुपये इतके राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ते ३ लाख १७हजार रुपये होते.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 06, 2026 | 12:36 PM
Economic Survey, GDP Growth Rate, FDI Maharashtra, GDP Growth Rate of Maharashtra 7.9%,

Economic Survey, GDP Growth Rate, FDI Maharashtra, GDP Growth Rate of Maharashtra 7.9%,

Follow Us
Follow Us:
  • पायाभूत सुविधांवरील खर्च वाढल्यामुळे मार्च २०२६ अखेर राज्यावरील कर्ज ९,३२,२४२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
  • सेवा आणि उद्योग क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रातील वाढ मंदावली असून ती केवळ ३.४ टक्के आहे
  • मेट्रो, महामार्ग आणि बंदरे यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे राज्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे.
Maharashtra Economic Survey 2025-26: राज्याचा आर्थिक विकास वेगाने होत असला तरी कर्जाचा बोजाही झपाट्याने वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठीचा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. या अहवालानुसार मार्च २०२६ अखेर महाराष्ट्रावरचे एकूण कर्ज ९ लाख ३२ हजार २४२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पायाभूत सुविधा, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वाढ, तसेच परदेशी गुंतवणुकीत अव्वल स्थान यामुळे राज्याचा आर्थिक विकासदर ७.९ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषी व संलग्न क्षेत्रातील वाढ मात्र ३.४ टक्क्यांवर मर्यादित राहण्याचा अंदाज असून उद्योग क्षेत्रात ५.७ टक्के आणि सेवा क्षेत्रात ९ टक्के वाढ अपेक्षित आहे.

Economic Survey: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुसाट! ७.९ टक्क्यांच्या विकासदरासह देशाच्या जीडीपीमध्ये १४ टक्क्यांचा ‘सिंहाचा वाटा

राज्याचे दरडोई उत्पन्नही  वाढले असून २०२५-२६ साठी ते ३ लाख ४७ हजार ९०३ रुपये इतके राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ते ३ लाख १७हजार रुपये होते. देशातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून राज्याने पुन्हा अव्वल स्थान राखले आहे. मात्र महसुली जमेपेक्षा खर्च अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२५-२६ मध्ये महसुली उत्पन्न ५ लाख ६० हजार ९६४ कोटी रुपये अपेक्षित असताना खर्च ६ लाख ६ हजार ८५५ कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची महसुली तूट राहणार आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांसारख्या योजनांमुळे खर्चात वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रात यंदा सरासरीपेक्षा १०९ टक्के पाऊस झाला. खरीप हंगामात १५७.२७ लाख हेक्टरवर पेरणी झाली. तृणधान्य, ऊस आणि कापूस उत्पादनात वाढ अपेक्षित असली तरी कडधान्य आणि तेलबिया उत्पादनात अनुक्रमे २८.२ टक्के आणि ४७.४ ₹ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. सिंचनाच्या टक्केवारीबाबत मात्र यंदाही अहवालात माहिती देण्यात आलेली नाही. जून २०२४ अखेर मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांतून ५७.१६ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प आज केला जाणार सादर;

सन २०२५-२६ मध्ये कर महसूल ४.७७लाख कोटी आणि करेतर महसूल ३३ हजार ५२ कोटी अपेक्षित

सप्टेंबर २०२५ पर्यंत ४३,८९४ कोटी रुपयांचे पीक कर्ज आणि ६८,३१४ कोटी कृषी मुदत कर्ज वितरित

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ४ लाख शेतकरी बाधितः ३३७ कोटी रुपयांची मदत

नवीकरणीय ऊर्जेच्या क्षमतेत राजस्थान आणि गुजरातनंतर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

३१ जानेवारी २०२६ पर्यंत ई-श्रम पोर्टलवर राज्यातील १.८३ कोटी कामगारांची नोंद

राज्यातील बेरोजगारीचा दर ३.३ टक्के असल्याची अहवालात नोंद,

 

Web Title: The state treasury has a debt of rs 932 lakh crore by the end of march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Economic Survey
  • FDI
  • GDP

संबंधित बातम्या

GDP वाढीबाबत मोठी Good News! 7.7% च्या ऐतिहासिक वेगाने धावणार भारताची अर्थव्यवस्था
1

GDP वाढीबाबत मोठी Good News! 7.7% च्या ऐतिहासिक वेगाने धावणार भारताची अर्थव्यवस्था

तुमच्या Home Loan आणि Car Loan चा EMI वाढणार की कमी होणार? RBI च्या निर्णयामुळे नेमका काय होणार परिणाम?
2

तुमच्या Home Loan आणि Car Loan चा EMI वाढणार की कमी होणार? RBI च्या निर्णयामुळे नेमका काय होणार परिणाम?

RBI च्या अंदाजामुळे सर्वसामान्यांना फटका! महागाई वाढणार, विकासदर घटणार; नेमका काय परिणाम होणार?
3

RBI च्या अंदाजामुळे सर्वसामान्यांना फटका! महागाई वाढणार, विकासदर घटणार; नेमका काय परिणाम होणार?

फळबाजारात भेसळीचा पर्दाफाश; आंबे पिकवण्यासाठी इथेनॉल स्प्रेचा वापर, ठाणे, वाशीत एफडीएची छापेमारी
4

फळबाजारात भेसळीचा पर्दाफाश; आंबे पिकवण्यासाठी इथेनॉल स्प्रेचा वापर, ठाणे, वाशीत एफडीएची छापेमारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.