पुणे : आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत सारथीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीची मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते. दोनशे विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती देण्याची मर्यादा वाढविण्याची मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ‘पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?’ असा थेट सवाल केला होता. याचा विद्यार्थी निषेध व्यक्त करत आहेत.