दगड मातीचे रस्ते बनले खड्डेमय, पर्यटकांचा घोड्यावरील प्रवास धोकादायक, प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी
माथेरान: महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान देशातच नाही तर संपूर्ण आशियातील एकमेव शहर आहे. जेथे कोणत्याही प्रकारचे वाहन चालविण्यास मनाई आहे. या शहराला लोक ऑटोमोबाईल वाहन फ्री सिटी म्हणून ओळखले जाते. येथे फिरण्यासाठी अडीच किलोमीटरचे अंतर पायी पार करावे लागते. तसेच घोड्यांवरुन सर्व पाँईंट पाहावे लागतात. भारताचे सर्वात लहान हिल स्टेशन जे केवळ 7 किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. मात्र या माथेरान शहरात डांबरी रस्ते बनविण्यास बंदी असल्याने तेथे जंगल भागातील रस्ते दगड माती यांचे बनविले जातात.शहरातील अनेक दगड मातीच्या रस्त्यांची दुरुस्ती माथेरान नगरपरिषदेने उन्हाळ्यात केले नाहीत आणि त्यामुळे अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. दरम्यान पर्यटकांची वर्दळ असलेला इन्स्पेक्शन बंगला ते शार्लोट लेक पॉइंट या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी अश्वपालक राकेश कोकले यांनी केली आहे.
माथेरान शहरात पर्यटक घोड्यावरून सैर करण्यासाठी येत असतात. त्यात प्रामुख्याने महात्मा गांधी रस्त्याने पर्यटक हे घोड्यावरून ओलपिया रेसकोर्स मैदान येथे जात असतात. या मार्गावरील रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले नाहीत. महात्मा गांधी रस्त्यात पुढे क्ले पेव्हर ब्लॉक घोड्या चालत असल्याने लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वखारी नाका पासून छत्रपती शिवाजी महाराज रोड येथेपर्यंत रस्ता हा दगड मातीचा आहे. त्याच ठिकाणी माथेरान नगरपरिषद कार्यालय असून कार्यालयाच्या बाहेरील रस्ता देखील दगड मातीचा आहे. याच भागातील इन्स्पेक्शन बंगला ते शारलोट लेक पॉईंट पर्यंत रस्त्याची अवस्था खूप दयनीय झाली आहे. हा रस्ता पालिकेने दगड माती टाकून सुधारणा केलेला नाही आणि त्यामुळे रस्त्यावर पावसाने मोठे पाण्याचे प्रवाह वाहून जावून घोड्यांसाठी धोकादायक बनला आहे. याच खराब तरुण घोडेवाल्यांना तसेच हातरिक्षा चालक यांना पर्यटकांना घेऊन जावे लागते. त्या रस्त्याने पर्यटकाने चालणे कठीण होऊन गेलेले असताना घोडेवाल्यांना जीव मुठीत घेऊन घोडे चालवावे लागत आहेत.
दरम्यान, त्या भागातील रस्त्यावरील खड्डे यामुळे घोड्यावर बसलेले पर्यटक सुद्धा घाबरले जातात आणि कधी घोडा पडेल सांगू शकत नाही.एवढे भयावह अवस्था या रस्त्याची झाली असून एवढा रस्ता खराब झालेला असताना आणि मुख्य म्हणजे पालिकेच्या कार्यालयाच्या भागातील हा रस्ता असताना सुद्धा पालिकेचे बांधकाम विभाग शांत आहे याचे आश्चर्य वाटत असल्याचे मत अश्व पालक राकेश कोकळे यांनी व्यक्त केले आहे. राकेश कोकळे यांनी इन्स्पेक्शन बंगला ते शार्लोट लेक पॉइंट या भागातील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करणारे निवेदन पालिकेला सादर केले आहे. यानगर परिषदेने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त आणि पर्यटक प्रवासी यांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी राकेश कोकळे यांनी केली आहे.