
Ahilyanagar News: चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट घरावर आदळला, मोठी जीवितहानी टळली
जोर्वे–रहीमपूर (ता. संगमनेर) मार्गावर रविवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोंबडीखताने भरलेला भरधाव आयशर टेम्पो थेट विहिरीचे कठडे तोडत एका घरावर आदळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की काही क्षणांत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, टेम्पो विहिरीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि अनेकांचे प्राण वाचले.
सटाणा तालुक्यातील देवळाभोर येथील आयशर टेम्पो (एमएच ४१ एव्ही ६१८३) कोंबडीखताच्या गोण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील खांबा येथे आला होता. काही माल उतरवल्यानंतर हा टेम्पो आश्वी–रहीमपूर मार्गे संगमनेरकडे निघाला होता.
Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?
पहाटे सुमारे तीनच्या सुमारास जोर्वे शिवारातील लहानू बाळाजी जाधव यांच्या वस्तीजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही सेकंदांतच टेम्पो वेगाने पुढे घुसत महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरजवळून गेला. ट्रान्सफॉर्मर थोडक्यात बचावला असला तरी त्याचे ताण तुटले. त्यानंतर टेम्पोने विहिरीचे सिमेंटचे कठडे उद्ध्वस्त करत थेट विहिरीपलीकडील जाधव यांच्या घरावर जोरदार धडक दिली.
मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. अपघातस्थळाच्या काही अंतरावर वीटभट्टीवर अनेक मजूर कुटुंबे झोपलेली होती. टेम्पो विहिरीत अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
Mumbai Local : CSMT स्थानकावरील ‘या’ प्लॅटफॉर्मच्या विस्तार, 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यात होणार वाढ
या अपघातात जाधव कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. घराचा पाया आणि भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून विहिरीचे कठडे, विद्युत मोटार आणि पाईपलाईन पूर्णपणे मोडीत निघाली आहे. टेम्पोमधील चालक व अन्य प्रवाशांना सुदैवाने किरकोळ दुखापती झाल्या आहेत.