• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Weather Cold Wave Increase Next Few Days People Wear Sweater Latest Weather Updates

Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी (ता. २१) किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 20, 2026 | 07:41 PM
Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?

पुण्यात थंडी वाढणार (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शहरात पुढील दोन दिवस गारठा कायम
हवामान स्थिर राहण्याचा अंदाज
तापमानात झाली लक्षणीय घट

पुणे: गेल्या दोन दिवसांपासून शहरात किमान तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात येत असून त्यामुळे गारठा वाढला आहे. पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याने हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. परिणामी पुणे शहर आणि परिसरात गारठा पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.

शहर व परिसरात मागील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ दिसून येत असली, तरी किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. मंगळवारी (दि.२०) शहराचे किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पहाटे व सायंकाळी हवेतील गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र वाढलेल्या कमाल तापमानामुळे कडक उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे पुणेकरांना सध्या थंड व उष्ण अशा संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी (ता. २१) किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर सकाळच्या वेळेत विरळ धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Weather : हवामान बदलणार! राज्यात थंडीचा जोर कमी, कसा होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर अपडेट

दरम्यान, गुरुवारपासून (ता. २२) किमान व कमाल तापमानात हळूहळू किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून आकाश मुख्यतः निरभ्र राहील. सायंकाळच्या वेळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात थंडीचा जोर कमी?

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बोचरी थंडी ही सामान्य बाब असली तरीही मुंबईकरांना मात्र या थंडीचा अनुभव क्वचितच येतो, परंतु, रविवारी रात्रीपासूनच मुंबईचा पारा कमालीचा घसरल्यामुळे मुंबईकरांनीही बोचरी थंडीचा अनुभव घेतला. रविवारी रात्री कुलाबा येथे किमान १९ तर सांताक्रुझ येथे १५.९ अंश तापमानाची नोंद झाली, जे की या मोसमातील निच्चांकी तापमान ठरले. कुलाबा येथे २८.० अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा २.१ अंश सेल्सिअसने कमी होते. तर सांताक्रूझ येथे २७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंश सेल्सिअसने कमी होते. किमान आणि कमाल तापमानाच्या एकत्रित नीचांकी नोंदीमुळे मुंबईतील थंडी बोचरी ठरली.

Web Title: Pune weather cold wave increase next few days people wear sweater latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Cold Wave
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : उन्हाळ्याची चाहूल; मात्र रात्री थंडी कायम; चिमुकल्यांच्या आरोग्यावर परिणाम
1

Weather Update : उन्हाळ्याची चाहूल; मात्र रात्री थंडी कायम; चिमुकल्यांच्या आरोग्यावर परिणाम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 12, 2026 | 04:15 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM
Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Feb 11, 2026 | 10:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.