Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर जोरदार आंदोलन

राज्यातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसने भुसे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 28, 2026 | 04:53 PM
TET पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर जोरदार आंदोलन

TET पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर जोरदार आंदोलन

Follow Us
Follow Us:

मुंबई : TET परीक्षेचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आज टीईटी परीक्षेचा पेपर होणार होता, मात्र हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

 

NEET नंतर आता TET चा पेपर फुटला आहे. प्रत्येक परीक्षेचे पेर फुटत आहेत. वारंवार होत असलेल्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात असून, सरकारच्या निष्काळजी आणि अपयशी कारभाराचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. प्रंचड पोलीस बंदोबस्त असतानाही गनिमी काव्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर पोहोचून झीनत शबरीन यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर “दादा भुसे राजीनामा द्या” असे पोस्टर फडकावले व भुसे राजीनाम्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “पेपरचोर गद्दीछोड”, “दादा भुसे राजीनामा द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्यांनी बंगल्यासमोरील परिसरात “पेपरचोर गद्दीछोड” अशा घोषणा लिहून सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात पेपरफुटी ही नित्याची बाब झाली आहे. NEET नंतर आता TET परीक्षेचाही पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे कष्ट, वेळ आणि भविष्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि सरकारने निष्पक्ष चौौकशी करून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

हे सुद्धा वाचा : ऑपरेशन उबाठा बुडवाचे सूत्रधार संजय राऊतच; खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघात

प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत भुसे यांच्या बंगल्यासमोर पोहोचून आंदोलन केले. पोलिसांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत युवक काँग्रेसचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

Web Title: The youth congress staged a protest outside dada bhuses residence against the tet paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Congress
  • dada bhuse
  • TET Exam

संबंधित बातम्या

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
1

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
2

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
3

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
4

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.