Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…तर या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा”, अजित पवार भाजपाच जाणार का? संजय राऊतांनी एकाच वाक्यात सांगितले ‘हे’ कारण… 

"कार्यक्रमातील नियोजन ढिसाळ होते, ऐन दुपारी भर उन्हात कार्यक्रम का घेतला, याची चौकशी झाली पाहिजे. यात अकरा जणांचा बळी गेला आहे, अजून काही गंभीर जंखमी आहेत, त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे", अशी मागणी केली.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 17, 2023 | 11:02 AM
“…तर या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा”, अजित पवार भाजपाच जाणार का? संजय राऊतांनी एकाच वाक्यात सांगितले ‘हे’ कारण… 
Follow Us
Follow Us:

मुंबई : रविवारी म्हणजे काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde)  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis) हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अनेक श्रीसेवकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.  यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आणखी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. तसेच यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना, राज्य सरकारवर टिका केली. “कार्यक्रमातील नियोजन ढिसाळ होते, ऐन दुपारी भर उन्हात कार्यक्रम का घेतला, याची चौकशी झाली पाहिजे. यात अकरा जणांचा बळी गेला आहे, अजून काही गंभीर जंखमी आहेत, त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे”, अशी मागणी केली.

अजित पवार रोखठोक आहेत पण…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. अजित पवारांच्या नाराजीबाबत माध्यमांनी प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, अजित पवार काल आमच्यासोबत होते, आम्ही एकत्र विमानातून प्रवास केला. ते रोखठोक आहेत, असलेही पाहिजे कारण ते विरोधीपक्षनेते आहेत, पण अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजापात जातील, असं मला वाटत नसल्याचा पुर्नउच्चार संजय राऊतांनी केला.

एनसीपी फोडण्यासाठी टाकला जातोय

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, काही आमदारांबाबत काही प्रकरणं चालू आहेत. त्यांच्यावर धाडी घालण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यांना सांगितलं जातंय की तुम्ही राष्ट्रवादी सोडा आणि भाजपाला पाठिंबा द्या. शिवसेना ज्या प्रकारे ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणांचा दबाव टाकून फोडली आणि हे सरकार बनवण्यात आलं, त्याच प्रकारचा दबाव एनसीपी फोडण्यासाठी टाकला जात आहे. असा राऊतांनी भाजपावर आरोप केला.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

काल रात्री उष्माघाताने बळी गेल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे. यानंतर आता ठाकरे गटाते खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे. समोर सहा-सात तास उन्हात बसलेल्यांची सोय न पाहाता व्यासपीठावर जो राजकीय मंच सजला होता. नियोजनचा अभाव दिसला. कार्यक्रम दुपारी का घेतला याची चौकशी झाली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

Web Title: Then a case of murder should be filed against this government will ajit pawar go to bjp sanjay raut said in one sentence this because

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2023 | 11:02 AM

Topics:  

  • appasaheb dharmadhikari
  • BJP
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!
2

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
3

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
4

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.