Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला

सातारा जिल्ह्यातील रहीमतपूर येथे पोलिसांनी आणि बाल संरक्षण यंत्रणेने वेळेवर हस्तक्षेप करत १५ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला. गावाबाहेरील मंदिरात विवाहाची संपूर्ण तयारी झालेली असतानाच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विवाह सोहळा थांबवला. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 27, 2026 | 03:03 PM
लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला (फोटो सौजन्य-ChatGPT)

लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • रहीमतपूर पोलिसांच्या सतर्कतेने १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह हाणून पाडला
  • बालपणाला मिळाले कायद्याचे संरक्षण
  • लग्नाची सनई थांबली; पोलिसांचा सायरन धावला!
अनिल कदम, सातारा : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन घुमला आणि एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. रहीमतपूर पोलीस आणि बाल संरक्षण यंत्रणेच्या वेळेवर केलेल्या धाडसी व संवेदनशील कारवाईमुळे १५ वर्षे ३ महिने वयाच्या बालिकेचा बालविवाह रोखण्यात आला. या कौतुकास्पद कारवाईमुळे एका निष्पाप मुलीला नवजीवन मिळाले असून संपूर्ण परिसरातून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

२६ जून रोजी रहीमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांना हद्दीतील एका गावाबाहेरील मंदिरात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता पथकासह विवाहस्थळी धाव घेतली. मंदिरात विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि सुमारे २५ ते ३० नातेवाईक उपस्थित होते. विवाहविधी सुरू होण्याच्या काही क्षणांपूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करून संपूर्ण सोहळा थांबवला. त्यानंतर मुलीच्या जन्मतारखेची आणि अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तपासात मुलीचे वय केवळ १५ वर्षे ३ महिने असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे किमान विवाहयोग्य वय १८ वर्षे असल्याने पोलिसांनी तातडीने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

Aditi Tatkare: पुढील ५ वर्षांत बालविवाह १० टक्क्यांखाली आणणार! विधानसभेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

पोलिसांनी कोरेगाव येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बालिकेला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सातारा जिल्हा बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने बालिकेला काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालिका घोषित करत तिच्या शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलीचा विवाह लावणे, त्यासाठी मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. अशा प्रकारात सहभागी होणारे पालक, नातेवाईक, भटजी, मंडप व्यावसायिक किंवा इतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासन किंवा १०९८ चाइल्डलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

ही उल्लेखनीय कारवाई प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हवालदार प्रवीण बर्गे, शंकर घाडगे, महेश शेडगे, सुशांत शिंदे, महिला पोलीस हवालदार शितल सानप, पोलीस कॉन्स्टेबल समाधान देशमुख, संजय सपकाळ, तुषार काळंगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घाडगे, शुभांगी पाटोळे, अर्पिता गायकवाड तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांनी संयुक्तपणे पार पाडली. या संवेदनशील आणि समाजहिताच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. एका अल्पवयीन मुलीचे बालपण वाचवणारी ही कारवाई केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून समाजाप्रती असलेली पोलिसांची संवेदनशील बांधिलकी अधोरेखित करणारी ठरली आहे.

बालविवाह केल्यास आता होणार कैद; महाबळेश्वर प्रशासनाचा कडक इशारा

Web Title: Rahimatpur police stop child marriage of 15 year old girl before wedding ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Child Marriage
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
1

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.