मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना शिव्या देतात. मुख्यमंत्री काम करतात. विरोधकांकडे काही कामच नाही. शिव्या देऊन त्यांना प्रसिद्धी मिळते. याचाच आनंद त्यांना मिळतो. यासाठी ते हे करतात. बिचाऱ्यांना टिकाच करुन द्या, असे टोला कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठाकरे गटाला लागावला आहे. माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम येथील ठाणकर पाडा परिसरात विविध विकास कामाच्या लोकार्पण करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमादरम्यान भोईर यांनी हे विधान केले आहे. माजी नगरसेवक उगले यांच्या विभागातील विकास कामाचे लोकार्पण भोईर यांच्या हस्ते केले. या प्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी पदाधिकारी छाया वाघमारे आणि नेत्रा उगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उगले यांनी त्यांच्या प्रभागात विकास कामे केली आहेत. त्याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करुन देण्याची हमी दिली आहे. त्याचबरोबर आमदार भोईर यांच्या आमदार निधीतूनही विकास कामे केली गेली आहेत. नागरीकांनी विकास कामाबद्दल निश्चींत राहवे अशी हमी दिली. विरोधकांचे काम टिका करणे असते. सत्ताधारी मंडळी विकास कामे करीत असता. ही विकास कामे जनहिताची असतात. त्यातून जनतेला दिलासा देणे हाच उद्देश असतो. रस्ते, पथदिवे आणि उद्यानांची कामे केली जात आहेत. असं यावेळी भोईर म्हणाले.