Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेळेवाडी-गमेवाडी मार्गावर संशयास्पद रसायनाचे तीन टँकर जप्त; आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे कारवाई

शुक्रवारी सकाळच्या सुमारास डेळेवाडी-गमेवाडी रस्त्यावर चिपळूण येथील एका कंपनीचे मळीच्या रसायनाने भरलेले तीन टँकर उभे असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2026 | 11:40 AM
डेळेवाडी-गमेवाडी मार्गावर संशयास्पद रसायनाचे तीन टँकर जप्त

डेळेवाडी-गमेवाडी मार्गावर संशयास्पद रसायनाचे तीन टँकर जप्त

Follow Us
Follow Us:

कराड : कराड तालुक्यातील डेळेवाडी-गमेवाडी मार्गावर संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या रसायनाने भरलेल्या तीन टँकरांवर आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कराड तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ते ताब्यात घेतले. टँकरमधील रसायनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास डेळेवाडी-गमेवाडी रस्त्यावर चिपळूण येथील एका कंपनीचे मळीच्या रसायनाने भरलेले तीन टँकर उभे असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. टँकर संशयास्पद स्थितीत उभे असल्याने त्यांनी चालकांकडे वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या व कागदपत्रांची चौकशी केली. मात्र, चालकांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य सहाय्यकांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे यांना याची माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने तत्काळ पोलिस प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधला.

कराड तालुक्यात खळबळ ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प

यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अमोल सातपुते, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही टँकर कराड तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी टँकरची सखोल पाहणी करून रसायनाचे नमुने संकलित केले. हे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून रसायनाची ने-आण, त्यासाठीची परवानगी, तसेच टँकर तेथे कोणत्या कारणासाठी उभे होते, याचा तपास सुरू आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धाराशिव जिल्ह्यात खतांचे मोठं रॅकेट उघड

दुसरीकडे, खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना चक्क लालसर मातीची विक्री केली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील कृषी विभाग, खत विक्रेते आणि संबंधित कंपनीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक ! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Web Title: Three tankers containing a suspicious chemical seized on the delewadi gamewadi route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • Karad news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.