चिखली : दोन मुलांसह दुचाकीने जात असेल्या सुरेश कांबळे यांच्या दुचाकीला गौणखनिज घेवून जाणाऱ्या टिप्परने धडक (Hit by tipper ) दिली. यात १२ वर्षीय मुलाचा (12 year old boy) घटनास्थळावरच, तर १५ वर्षीय दुसऱ्या मुलाचा (15 year old boy) रुग्णालयात नेताना मृत्यू (Death) झाला. वडील ( Father ) गंभीररित्या जखमी (Injuried ) झाले. ही घटना तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा ( Mundikota in Tiroda taluka) बसस्थानकाजवळ २९ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक, उत्खनन होत असून याकडे महसूल विभागाचे डोळेझाक होत आहे. बेलगाम वाहतुकीमुळे अपघात होऊन लोकांचा जीव जात असून आतातरी महसूल विभागाने डोळे उघडून या अवैद्य गौण खनिज व्यावसायिकांवर आळा घालावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे. १५ जून रोजी तिरोडा धापेवाडा- गोंदिया मार्गावर अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारी टीपरणे दोन निरपराध युवकांचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये महसूल विभाग व प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष उत्पन्न होऊन पोलिसांवर दगडफेक करून रास्ता रोको करण्यात आला. यामुळे निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करून अटकसत्र सुरू असतानाच २९ जून रोजी रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान घाटकुरोडा निवासी सुरेश कांबळे आपल्या दोन मुलांसह एमएच ३६, पी ६५८५ क्रमांकाच्या दुचाकीने घाटकुरोडाकडे जात होते.
दरम्यान मुंडीकोटा घाटकुरोडा मार्गावरील रेल्वे गेट ३ दिवस बंद असल्याने पाटीलटोला मार्गाने जाण्याकरता मुंडीकोटावरून जात होते. दरम्यान बसस्थानकासमोर भरधाव वेगाने तिरोडाकडून तुमसरकडे अवैध गौण खनिज घेऊन जाणाऱ्या विना क्रमांकाच्या भरधाव टिप्पने दुचाकीला धडक दिली. यात सुमारे ५० फूट अंतरापर्यंत दुचाकी फरफटत गेली. १२ वर्षांचा पियुष सुरेश कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मोठा भाऊ १५ वर्षीय धृव कांबळे व वडील सुरेश कांबळे ४० यांचा उजवा पाय तुटून जखमी झाले. सुरेश कांबळे व धृव यांना उपचाराकरीत सुभाष रुग्णालय तुमसर व तेथून भंडाराकडे नेत असताना धृवचा वाटेतच मृत्यू झाला.
सुरेश कांबळे यांच्यावर भंडारा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर टिप्पर चालक पसार झाला. तिरोडा पोलिसांना मिळताच महालगाव येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मोठ्या फौज फाटा घेउन तिरोडा पोलीस घटनास्थळी पोहोचून मृत पियुषचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शवविच्छेदनाकरिता पाठविले. टिप्पर (एमएच ४०, एके ६३२३) चालक प्रितम ताराचंद तुमसरे (वय २६, रा. सालई) याला अटक करण्यात आली. अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालक व मालकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.