'Caught in Providence' फेम न्यायाधीश फ्रॅंक कॅप्रियो यांचे निधन; वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Ameria News in marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रसिद्ध आणि जगभरातील लोकांच्या मनात स्थान मिळवणारे न्यायाधीश फ्रॅंक कॅप्रियो यांचे निधन झाले आहे. त्यांनी बुधवारी २० ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षाचे होते. गेल्या बऱ्याच काळापासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा आजाराने त्रस्त होते. दरम्यान काल बुधवारी (२० ऑगस्ट) त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबाने सोशल मीडिया द्वारे ही माहिती दिली. यामुळे जगभरातून दु:ख आणि कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
अमेरिकेमध्ये त्यांना न्यायव्यवस्थेमध्ये मोठा आदर होता. त्यांना जगभर ओळख मिळाली ती त्यांच्या ‘कॉट इन प्रोव्हिडन्स’ या कोर्ट शोमुळे. हा शो जगभर खूप प्रसिद्ध झाला आहे. २०१८ मध्ये हा शो सुरु झाला होता. यानंतर २०२० पर्यंत या शो ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यासाठी अनेक डेटाइम एमी ऑवर्डसाठी नामांकनही या शो ला मिळाले होते. याचे अनेक व्हिडिओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.
फ्रॅंक कॅप्रियो कोर्टापुरतेच मर्यादित राहिले नाही. त्यांच्या दयाळू स्वभावामुळे आणि मानवतावादी निर्णयांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांचे इन्स्टाग्रावर ३.४ दशलक्ष ऑलोवर्स आहेत. त्यांचे व्हिडिओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांनी अनेकदा कोर्टामध्ये गरीब कुटुंबांचे दंड माफ केले आहेत.
तसेच लहान मुलांप्रती त्यांना विशेष प्रेम होते. त्यांनी लहान मुलांना भरपूर प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या शो मध्ये मुलांना बोलवले जायचे. त्यांनी मुलांना न्यायालयात अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. त्यांना त्यांच्या शैलीतून न्यायालय केवळ कठोर शिक्षा देण्याठीच नसते, तर तुमची चूक नसल्यास येथे तुम्हाला योग्य न्यायही मिळतो, लोकांना आशाही मिळते हे दाखवून दिले.
Judge Frank Caprio, beloved for his kindness on Caught in Providence, has passed away at 88.
Known as the “nicest judge in the world”
Rest in piece King 🙏pic.twitter.com/T0ELWFPUBS
— Dudes Posting Their W’s (@DudespostingWs) August 20, 2025
कॅप्रियो यांनी मरणापूर्वी एक दिवस आधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ते रुग्णालयात असल्याचे दिसून ले. त्यांना लोकांना प्रार्थना करम्याचे आवाहन केले होते. त्यांचा विश्वास आहे की, न्यायात दया आणि मानवता असली पाहिजे.
न्यायाधीश कॅप्रियो यांचा जन्म अमेरिकेच्या रोड आयलंडमध्ये झाला. त्यांच्या मृत्यूनंतर रोड आयलंडचे गव्हर्नर यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी कॅप्रियो यांना राज्याचा खजिना म्हणून वर्णन केले. रोड आयलंडमध्ये त्यांच्या सन्मानार्थ ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला आहे.
त्यांना अमेरिकेच्या नगरपालिका न्यायाधीश म्हणून काम पाहिले. २०२३ मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे आढळून आले. त्यांच्या कुटुंबावर सध्या दु:खाचे ढग आहेत. कुटुंबाने सांगितले की, ते एक चांगला नवरा, वडील, आजोबा आणि पणजोबा म्हणून आठवणीत राहतील. त्यांचा दयाळूपण आणि माणुसकी नेहमीच लक्षात राहिल.
भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट? ट्रम्पच्या मदतीने बांगलादेशला ‘पूर्व पाकिस्तान’ बनवण्याची तयारी