Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Torent Dam: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल? वन अधिकारी कुठे आहेत; कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल

Torent Dam: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रातील परिसरात झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित वृक्षतोडीमुळे पर्यावरणाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वन विभागाच्या भूमिकेवर कर्जत पर्यावरण बचाव समितीने सवाल उपस्थित केले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 21, 2026 | 01:19 PM
टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल? वन अधिकारी कुठे आहेत; कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल

टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल? वन अधिकारी कुठे आहेत; कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात परिसरात झाडांची कत्तल
  • वन अधिकारी कुठे आहेत?
  • कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल
कर्जत: कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायत मध्ये टोरंट पॉवर कंपनी वीज प्रकल्प उभारत आहे.या प्रकल्पाच्या दृष्टीने वेगळ्या हालचाली सुरू झाल्याने कर्जत पर्यावरण बचाव समिती आक्रमक झाली आहे.त्या ठिकाणच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या जमिनीवरील झाडे तोडण्यास सुरुवात झाली असल्याने झाडे तोडण्यासाठी जमिनी कोणी दिल्या असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. (Torent Dam)

खलाटी येथे सायडोंगर भागात हायड्रॉलिक प्रकल्प

गुजरात राज्यातील टोरंट पॉवर या कंपनीला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी येथे सायडोंगर भागात हायड्रॉलिक प्रकल्प उभारत आहे. या प्रस्तावित धरण प्रकल्पाला धरण परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी विरोध केला आहे.तेथे ६४० हेक्टर जमीन वन विभागाची असून २३० हेक्टर जमीन खासगी जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.वन जमिनीवर असलेली लाखो झाडे आहेत आणि ही झाडे स्थानिकांनी श्रमदान करून लावली आणि वाढवली आहेत.

आता तीच सर्व झाडे तोडण्यास सुरुवात झाली असून या धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेली झाडे नष्ट होऊ लागली आहे. बुडीत क्षेत्रातील काही जमीन क्षेत्र हे खासगी असून त्या जमिनीवरील झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे.या १५००० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तीन नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे प्रकल्पाच्या परिसराची हवाई सफर देशाचे पंतप्रधान करू शकतात आणि त्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील झाडांची तोड टोरंट कंपनी प्रशासनाने हाती घेतली आहे.

शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन दिलेली नाही

टोरंट कडून सायडोंगर परिसरातील आदिवासी वाडी पासून पुढील जंगलात इलेक्ट्रिक कटर यांच्या सहाय्याने झाडे तोडली जात आहे.त्यावेळी तोडण्यात येत असलेली झाडे तेथून उचलण्यास देखील कामगार लावण्यात आले आहेत. शंभर वर्षे आणि त्याहून जुनी झाडे तोडली जात असून त्या ठिकाणचा संपूर्ण परिसरात कोणत्याही झाडाच्या अडथळा विना दाखवता यावा यासाठी सर्व झाडे तोडली जात आहेत.मात्र येथील ६४० हेक्टर जमिनीवरील झाडे लावण्याचे नियोजन कोणतेही नाही तसेच वन विभागाने जमीन प्रकल्पाला दिल्याचे कोणतेही पत्र वन विभाग स्थानिकांना देत नाही.

तसेच असे कोणतेही पत्र आतापर्यंत सोशल मीडियावर देखील दिसून आलेले नाही आणि असे असताना झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे कर्जत पर्यावरण बचाव समिती आक्रमक झाली आहे. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन दिलेली नाही आणि असे असताना देखील झाडे तोडली जात असतील तर आपल्या कोणत्या जगात आहोत असा प्रश्न कर्जत तालुक्यातील पर्यावरण प्रेमी उपस्थित करीत आहेत.मात्र बुडीत क्षेत्रातील झाडे तोडली जात असल्याने प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टोरंट धरण परिसरात नेमका कोणता प्रकार घडल्याचा आरोप आहे?

    Ans: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रातील परिसरात झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप कर्जत पर्यावरण बचाव समितीने उपस्थित केला आहे.

  • Que: या प्रकरणात कर्जत पर्यावरण बचाव समितीने कोणता सवाल उपस्थित केला आहे?

    Ans: परिसरात झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप असताना वन अधिकारी कुठे आहेत आणि वृक्षतोड रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.

  • Que: टोरंट धरण परिसरातील वृक्षतोडीबाबत पुढे काय होऊ शकते?

    Ans: वृक्षतोडीच्या आरोपांची चौकशी, संबंधित परवानग्यांची तपासणी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई होण्याची मागणी केली जाऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतरच स्पष्टता येईल.

Web Title: Torent dam submergence area tree cutting karjat environment committee sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

Amravati Teacher Election: सुरेश देवकर यांच्या प्रचारासाठी कपिल पाटील मैदानात; विजयाचा विश्वास व्यक्त
1

Amravati Teacher Election: सुरेश देवकर यांच्या प्रचारासाठी कपिल पाटील मैदानात; विजयाचा विश्वास व्यक्त

येरवडा दुर्घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडमध्ये; कंत्राटदाराची सर्व कामे काढणार
2

येरवडा दुर्घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडमध्ये; कंत्राटदाराची सर्व कामे काढणार

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?
3

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा
4

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.